Pune new guidelines : कॉलेज, हॉटेल ते नाट्यगृह, पुण्यासाठी नवे नियम काय?

| Updated on: Oct 08, 2021 | 4:42 PM

Pune new unlock guidelines पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कोरोना आढावा बैठक घेऊन, नवे नियम जाहीर केले. अजित पवारांनी पुणे जिल्ह्यासाठी नवी गाईडलाईन जारी केली.

Pune new guidelines : कॉलेज, हॉटेल ते नाट्यगृह, पुण्यासाठी नवे नियम काय?
Ajit Pawar
Follow us on

पुणे : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कोरोना आढावा बैठक घेऊन, नवे नियम जाहीर केले. अजित पवारांनी पुणे जिल्ह्यासाठी नवी गाईडलाईन जारी केली. यानुसार आता सोमवारपासून खासगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहोत, मात्र नियमाचे पालन करावं लागेल. 22 ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी सांगितलं. इतकंच नाही तर पुण्यातील हॉटेल आता 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अजित पवार म्हणाले, दर आठवड्याच्या प्रथेप्रमाणे आज बैठक पार पडली. सोमवारपासून खाजगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहोत. मात्र नियमांचे पालन करावं लागेल. नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी असेल. हॉटेल रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल.

विद्यार्थ्यांना दोन डोस बंधनकारक

सोमवारपासून कॉलेज सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन्ही डोस घेणं बंधनकारक असेल. ज्यांनी दोन डोस घेतले त्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे. असं अजित पवार म्हणाले.

झोपडपट्टी परिसरात लसीकरण कमी होत आहे. पुण्याचा कोरोना दर 2.5 दर आहे. बाधित दर 3 टक्के आला आहे. पहिला डोस घेण्याऱ्यांचे प्रमाण 103 टक्के आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

संबंधित बातम्या  

Pune Corona Update : हॉटेल रात्री 11 वाजेपर्यंत सुरु होणार, नाट्यगृहसुद्धा उघडणार, अजित पवारांकडून पुण्याला मोकळं करण्याचा प्लॅन जाहीर