VIDEO : वयस्कर महिला पतीसोबत घरी जात असताना सोसायटीत चोरटे शिरले, गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, घटना सीसीटीव्हीत कैद

पतीसमवेत रस्त्याने पायी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या चोरट्यास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे (Pune Police arrest chain snatcher at bibtewadi area).

VIDEO : वयस्कर महिला पतीसोबत घरी जात असताना सोसायटीत चोरटे शिरले, गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, घटना सीसीटीव्हीत कैद
| Updated on: Apr 04, 2021 | 4:02 PM

पुणे : पतीसमवेत रस्त्याने पायी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या चोरट्यास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विशाल अनिल भांडे (वय 19) असे या चोरट्याचे नाव आहे. तो बिबवेवाडी येथील नीलकमल सोसायटी येथे वास्तव्यास आहे. त्याने भर दुपारी साडेबारा वाजता महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले होते. पोलिसांनी तक्रार केल्यानंतर अवघ्या सात दिवसांच्या चोरट्याला बेड्या ठोकल्या (Pune Police arrest chain snatcher at bibtewadi area).

महिलेची पोलिसात तक्रार

याप्रकरणी 77 वर्षीय महिलेने पोलिसात फिर्याद दिली होती. ही महिला पतीसमवेत 28 मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलीला भेटायला महेश सोसायटीजवळून पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 87 हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते (Pune Police arrest chain snatcher at bibtewadi area).

पोलिसांनी कसा तपास लावला?

पोलीस उपनिरीक्षक राजेश उसगावकर, कर्मचारी अमोल शितोळे, राहुल कोठावळे यांनी या परिसरातील 35 ते 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यावेळी ही चोरी विशाल भांडे याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्याकडून 25 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले आहेत.

व्हिडीओ बघा : 

हेही वाचा : कल्याणमधील लग्न समारंभात गर्दी, ‘वधूपिता’ शिवसेना माजी नगरसेवकावर गुन्हा