AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलग 12 तास, 70 पेक्षा जास्त CCTV अन् पुणे पोलिसांचं मिशन चिमुकली, नेमकं काय घडलं?

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण झालेल्या १ वर्षाच्या चिमुकलीची बंडगार्डन पोलीस आणि गुन्हे शाखेने अवघ्या १६ तासांत सुखरूप सुटका केली आहे. ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढून दोन महिलांसह तिघांना दौंड येथून अटक केली. सविस्तर बातमी वाचा.

सलग 12 तास, 70 पेक्षा जास्त CCTV अन् पुणे पोलिसांचं मिशन चिमुकली, नेमकं काय घडलं?
pune police
| Updated on: Jun 02, 2026 | 12:39 PM
Share

पतीसोबत झालेल्या वादानंतर घर सोडून आलेल्या एका महिलेच्या १ वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना पुणे रेल्वे स्थानक परिसरात घडली. मात्र, पुणे शहर गुन्हे शाखा आणि बंडगार्डन पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत सलग १२ तास ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यानंतर अवघ्या १६ तासांत या चिमुकलीची दौंड येथून सुखरूप सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे. प्राथमिक तपासात चाईल्ड ट्राफिकिंगच्या उद्देशाने हे अपहरण करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पतीसोबतचा वाद आणि अपहरणाची घटना

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या शिवानी अमोल भोसले (२१) हिचा पतीसोबत वाद झाला. या रागात ती घर सोडून ३० मे रोजी आपल्या एक वर्षाची मुलगी लीला हिच्यासह पुणे रेल्वे स्थानक परिसरात आल्या होत्या. राहण्याची कोणतीही सोय नसल्याने त्यांनी रेल्वे स्थानकातील आरक्षण कार्यालयाजवळील दत्त मंदिरासमोरील मोकळ्या जागेत रात्री मुक्काम केला.

रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास शिवानी यांना अचानक जाग आली, तेव्हा त्यांची मुलगी लीला शेजारी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने घाबरलेल्या त्यांना तातडीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला. यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासासाठी तातडीने तीन विशेष पथके तयार केली.

पोलिसांनी ३० मे रोजी रात्री १० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सलग १२ तास रेल्वे स्थानक आणि परिसरातील ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. या फुटेजमध्ये एक पुरुष आणि दोन महिला संशयास्पद रितीने चिमुकलीला घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीच्या आधारे पोलिसांनी पुढील माग काढला असता, हे संशयित चिमुकलीसह पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून सुटणाऱ्या पनवेल-नांदेड एक्सप्रेसमध्ये बसल्याचे स्पष्ट झाले.

संशयित आरोपी रेल्वेने पुढे निघून गेल्याचे समजताच पुणे पोलिसांनी रेल्वे सुरक्षा बल (RPF), शासकीय रेल्वे पोलीस (GRP) आणि रेल्वे मार्गावरील दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, बार्शी व लातूर येथील स्थानिक पोलिसांना तातडीने हायअलर्ट जारी केला. यानंतर पोलिसांचे विशेष पथक तातडीने दौंडच्या दिशेने रवाना झाले. ३१ मे रोजी दुपारी पोलिसांनी दौंड रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. द्रुपदा लक्ष्मण गायकवाड (३५), राधा आदिवासी (२०), लकी आदिवासी (२१) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

चिमुकली सुखरूप; पोलिसांचे कौतुक

पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी पुणे रेल्वे स्थानकातून चिमुकलीचे अपहरण केल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका करून तिला पुणे येथे आणले. तिच्या आईच्या स्वाधीन केले. १६ तासांच्या या थरारानंतर आपला पोटचा गोळा सुखरूप परत मिळाल्याने आई शिवानी भोसले यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पोलिसांनी दाखवलेल्या या धडाकेबाज कामगिरीचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Follow Us
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह