Pune crime : मोबाइल चोरण्यासाठी पंढरपूरच्या वारीत घुसले, पुणे ग्रामीण पोलिसांनी जेलच्या वारीत धाडले; झारखंडच्या तिघांना अटक

| Updated on: Jun 27, 2022 | 7:20 PM

पोलीस पथकाने चोरीच्या सुगावाच्या आधारे तपास सुरू केला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तीन लोकांना अटक केली आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या टोळीचा भाग असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

Pune crime : मोबाइल चोरण्यासाठी पंढरपूरच्या वारीत घुसले, पुणे ग्रामीण पोलिसांनी जेलच्या वारीत धाडले; झारखंडच्या तिघांना अटक
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे रोटी घाटातील दृश्य
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पंढरपूरच्या वारीत (Pandharpur wari) चोरी करण्यासाठी आलेल्या झारखंडमधील चोरट्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पंढरपूर वारी आणि पालखी मिरवणुकीत वारकऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी पुण्यात आलेल्या झारखंडमधील तीन अल्पवयीन मुलांसह सहा जणांचा यात समावेश आहे. या आंतरराज्य टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune rural police) पर्दाफाश केला आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. अटक करण्यात आलेले तीन संशयित, सोमरा नगर मोरी (26), आकाश दिलीप मोरी (25) आणि चंदन नगर मोरी (22) आणि हे तीन अल्पवयीन झारखंडमधील सरायकेला खरसावन जिल्ह्यातील एका गावातील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून सुमारे 14 लाख रुपये किंमतीचे तब्बल 101 चोरीचे मोबाइल जप्त (Mobiles seized) करण्यात आले आहेत. 24 जून रोजी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील अमर सोसायटीतून मोबाइल चोरीला गेल्याच्या कॉलला दौंड पोलीस स्टेशनच्या पथकाने प्रतिसाद दिला.

सक्रिय टोळीचा भाग

निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चोरीच्या सुगावाच्या आधारे तपास सुरू केला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तीन लोकांना अटक केली आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या टोळीचा भाग असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. इन्स्पेक्टर घुगे म्हणाले, की पंढरपूर वारीच्या काळात पुण्यात विशेषत: पालखी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या वारकर्‍यांचे मोबाइल चोरण्यासाठी आल्याचे अटक संशयितांनी सांगितले. संशयितांनी मध्य प्रदेशातील इटारसी आणि महाराष्ट्रातील भुसावळ, नागपूर, जळगाव, नाशिक आणि अमरावती तसेच झारखंडमधील काही ठिकाणांहूनही मोबाइल चोरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

हे सुद्धा वाचा

वारकऱ्यांच्या वेशातील पोलिसांच्या कारवाया

याआधी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पालखी मिरवणुकीत झालेल्या किरकोळ चोरी आणि दरोड्यात सहभागी असलेल्या 12 महिलांसह 55 जणांना अटक केली होती. वारकऱ्यांच्या वेशात आलेल्या पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम पुणे, सासवड आणि नंतर जेजुरी तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम पुणे (नाना पेठ), लोणी काळभोर, यवत, वरवंड याठिकाणी असताना झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.