Pandharpur wari 2022: असा आहे संत तुकोबांच्या पालखीचा कार्यक्रम; रिंगण सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक

पंढरपूरची वारी ही प्रत्येक वारकऱ्यासाठी एक मोठा उत्सव आणि सोहळा असतो. अत्यंत श्रद्धेने सर्वजण विठ्ठलाच्या भजन कीर्तनात रंगून गेलेले असतात. कोरोनामुळे दोन वर्षानंतर प्रथमच पालखी सोहळा साजरा होतो आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने 20 जूनला देहू येथून पंढरपूरकडे (Pandharpur wari 2022) प्रस्थान केले आहे. तर 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरकडे […]

Pandharpur wari 2022: असा आहे संत तुकोबांच्या पालखीचा कार्यक्रम; रिंगण सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 5:55 AM

पंढरपूरची वारी ही प्रत्येक वारकऱ्यासाठी एक मोठा उत्सव आणि सोहळा असतो. अत्यंत श्रद्धेने सर्वजण विठ्ठलाच्या भजन कीर्तनात रंगून गेलेले असतात. कोरोनामुळे दोन वर्षानंतर प्रथमच पालखी सोहळा साजरा होतो आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने 20 जूनला देहू येथून पंढरपूरकडे (Pandharpur wari 2022) प्रस्थान केले आहे. तर 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे. आज संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर माऊलींंची पालखी पुण्यात मुक्कामी आहे. यंदा तिथीवाढ असल्यामुळे संत तुकोबा महाराज यांच्या पालखीचा (Tukoba Palkhi 2022) मुक्काम इंदापूर आणि आंथुर्णे येथे असणार आहे. तसेच यंदा पालखीचा मुक्काम वाढणार असल्याची माहिती सोहळा समितीने दिली आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने कोरोना काळानंतर म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर प्रथमच पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे.

असे आहे पंढरपूर आषाढी वारी 2022 वेळापत्रक

संत तुकाराम महाराज पालखी कार्यक्रम

पालखी प्रस्थान 20 जून रोजी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

पहिलं गोल रिंगण 30 जून रोजी बेलवंडी येथे होणार आहे.

दुसरं गोल रिंगण 2 जुलै रोजी इंदापूर येथे होणार आहे.

तिसरं गोल रिंगण 5 जुलै रोजी अकलूज माने विद्यालय येथे होणार आहे.

पहिलं उभं रिंगण 6 जुलै रोजी माळीनगर येथे होणार आहे.

दुसरं उभं रिंगण 8 जुलै रोजी होणार आहे.

तिसरं उभं रिंगण 9 जुलै रोजी होणार आहे.

कोरोना काळानंतर यंदा आषाढी वारी पारंपारिक पद्धतीने साजरी होत आहे. आषाढी वारीनिमित्त अनेक वारकरी बांधव पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. येणारी गर्दी विचारत घेता योग्य त्या उपाययोजना, खबरदारी, सुरक्षा, आरोग्य याबाबत आवश्यक काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. कोरोनाचं सावट थोडं शमल्यानंतर आता अनेक दिंड्या, पालख्या पंढरपूर कडे प्रस्थान ठेवणार आहेत. यामध्ये संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या मानाच्या पालख्यांचाही समावेश आहे. काल या दोन्ही पालख्या पुणे नगरीमध्ये दाखल झाल्या होत्या यावेळी पुणेकरांनी मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत करत दर्शन घेतले. सामान्यांसोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. पुणे शहरात सध्या कोरोना संकटानंतर पहिल्यांदा संत ज्ञानोबा, संत तुकोबा महाराजांच्या पालख्या दाखल आहेत. या पालख्यांचा प्रवास पुण्यातून उद्यापासून सुरू होइल त्या पार्श्वभूमीवर आता पुणे शहरात वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल जाहीर करत जिल्हाधिकार्‍यांनी पर्यायी मार्ग निवडण्याचेही आवाहन केले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.