Pune Shaniwar Wada : पुण्यातल्या शनिवार वाड्यात अभ्यागतांसाठी आता सार्वजनिक शौचालय! पुरातत्व खात्यातर्फे सुविधा

| Updated on: Apr 19, 2022 | 7:30 AM

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) वारसा स्थळांवर सार्वजनिक सुविधा पुरवत आहे, ज्या कोणत्याही अभ्यागतासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पुण्यात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने शनिवार वाड्याचे (Shaniwar Wada) संवर्धन आणि जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घेतले आहे.

Pune Shaniwar Wada : पुण्यातल्या शनिवार वाड्यात अभ्यागतांसाठी आता सार्वजनिक शौचालय! पुरातत्व खात्यातर्फे सुविधा
शनिवार वाडा परिसरात बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय
Image Credit source: HT
Follow us on

पुणे : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) वारसा स्थळांवर सार्वजनिक सुविधा पुरवत आहे, ज्या कोणत्याही अभ्यागतासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पुण्यात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने शनिवार वाडा (Shaniwar Wada) या वास्तूचे संवर्धन आणि जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घेतले आहे आणि त्याच्या आवारात सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. एएसआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की अभ्यागतांनी मूलभूत सुविधांची विनंती केली. सार्वजनिक शौचालय (Public Toilet) बांधणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीकोनातून ही मुलभूत सुविधा पुरविण्याचे ठरवले आहे. शनिवार वाड्याला खिडकी दरवाजा, दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, गणेश दरवाजा आणि जांभूळ दरवाजा असे पाच दरवाजे आहेत. गणेश दरवाजा आणि जांभूळ दरवाजाजवळून जाताना लघवीची दुर्गंधी येत असल्याचे अभ्यागतांचे म्हणणे आहे. त्यानुसार ही नवी सुविधा पुरविण्यात आली आहे.

‘सार्वजनिक शौचालय असणे गरजेचे होते’

काही पाहुणे या गेट्सच्या कोपऱ्यांवर लघवी करताना दिसतात. त्यामुळे सार्वजनिक शौचालय असणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन एएसआयने अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले आहे. 1746मध्ये बांधलेला शनिवार वाडा शहरातील सर्वात प्रतिष्ठित वारसा वास्तूंपैकी एक आहे आणि दररोज 800 अभ्यागतांना आणि आठवड्याच्या शेवटी बरेच लोक येतात.

‘बाहेरील भिंत आणि त्याच्या दर्शनी भागाच्या संवर्धनाचे काम सुरू’

नोव्हेंबर 2021मध्ये माजी महापौर मुक्ता टिळक आणि स्थानिक इतिहासकार यांनी सखोल तपासणी केल्यानंतर दर्शनी भाग आणि दिल्ली दरवाजाची दुरवस्था झाल्याचे दिसून आले. एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बाहेरील भिंत आणि त्याच्या दर्शनी भागाच्या संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. आम्ही दर्शनी भागाचे जुने वैभव टिकवून ठेवण्याचे काम करत आहोत, परंतु याला वेळ लागणार आहे. काल जागतिक वारसा दिवस झाला, त्या पार्श्वभूमीवर ही माहिती देण्यात आली.

आणखी वाचा :

Mumbai HC : न केलेल्या गुन्ह्याची 12 वर्षे भोगली शिक्षा! पुण्यातल्या दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यातून चौघांची मुंबई उच्च न्यायालयानं केली सुटका

Pune SDPI Vs Raj Thackeray : अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, ‘एसडीपीआय’च्या अझहर तांबोळींचा राज ठाकरेंना इशारा

Pune Gopichand Padalkar : शरद पवारांना बहुजनांचा इतिहास मोडीत काढायचाय; किल्ल्यांच्या प्रश्नावरून गोपीचंद पडळकर आक्रमक