Pune Mandar Kiwale : मंदारचे हात कापल्यानंतर ‘बचके तू रहना रे..’ रिलची पुण्यात चर्चा, कोण आहे हा बब्या पवार?
Pune Mandar Kiwale : संपूर्ण राज्यात या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यात दिवसाढवळ्या न्यायाच्या मंदिराजवळच असे प्रकार होत असतील तर ते फार गंभीर आहे. मंदार किवळे या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.

पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाबाहेर काल सर्वसामान्यांना हादरवून सोडणार थरार घडला. कोर्टाच्या परिसरात हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळेवर हल्ला झाला. आधी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. पण मिस फायरमुळे मंदार किवळे बचावला. त्यानंतर मंदार किवळेचा पाठलाग करुन त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सहाजणांच्या टोळक्याने मिळून हे सर्व कांड केलं. त्यांनी मंदार किवळेवर कोयत्याने वार केले. त्यात मंदारचे हात शरीरापासून वेगळे झाले.
दिड वर्षापूर्वी पुण्यात शुभम चव्हाणची हत्या झाली होती. मंदार किवळे हा त्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. नुकतच चार दिवसांपूर्वी 21 नोव्हेंबरला मंदार तुरुंगातून बाहेर आलेला. बुधवारी न्यायालयीन कामासाठी म्हणून तो शिवाजीनगर कोर्टात आला होता. त्यावेळी शुभमच्या भावानेच अक्षय चव्हाणने हा सर्व कट रचला. त्याने मंदारवर कोर्ट परिसरातच हल्ला घडवून आणला. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली.
संपूर्ण राज्यात या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यात दिवसाढवळ्या न्यायाच्या मंदिराजवळच असे प्रकार होत असतील तर ते फार गंभीर आहे. मंदार किवळे या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याला स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. कोयत्याने मंदारवर वार करण्यात आले. हल्लेखोर वार केल्यानंतर “शुभम दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला, आम्हीच कात्रजचे राजे आहोत” अशी घोषणाबाजी करुन कोयते हवेत फिरवत होते.
‘बचके तू रहना रे’
पुण्यातील या थरारक घटनेनंतर आता एक रिल समोर आली आहे. हल्ला होण्याच्या काहीदिवस आधी म्हणजे पाच दिवस आधी सोशल मीडियावर ही रिल पोस्ट करण्यात आली होती. ‘किंग ऑफ कात्रज’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘बचके तू रहना रे’ या गाण्यासह रील पोस्ट करण्यात आली होती. ‘बचके तू रहना रे’ या गाण्यावरुन ही रिल करण्यात आलेली. ‘किंग ऑफ कात्रज’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून बब्या पवार याने ‘बचके तू रहना रे’ या गाण्याचा वापर करून रील पोस्ट केल्याचे दिसतंय. ही रील मंदार किवळेवरील हल्ल्याच्या पाच दिवस आधी पोस्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे या रीलची चर्चा सुरू झाली आहे. बब्या पवार याने ‘बचके तू रहना रे’ हे गाणं वापरुन ही रिल तयार केली होती.