Pune : ट्रॅफिक पोलिसाची चावी काढून घेणारेही आहेत की….! काय नियम लावलाय? वाचा

पुणे तिथे काय उणे! वाहतूक पोलिसांची हजेरी लावण्यासाठीचा 'हा' जुगाड नेमका काय आहे? वाचा सविस्तर

Pune : ट्रॅफिक पोलिसाची चावी काढून घेणारेही आहेत की....! काय नियम लावलाय? वाचा
पुणे वाहतूक पोलिसांसाठी अजब नियम
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Nov 02, 2022 | 2:07 PM

पुणे : पुणे वाहतूक पोलिसांना (Pune Police News) कामावर हजेरी लावायची असेल, तर त्यासाठी त्यांना सेल्फी (Selfie) काढावा लागणार आहे. काम सुरु करण्याआधी आणि काम संपवताना त्यांना सेल्फी काढून तो अपलोड करावा लागेल. कामावर हजर झाल्याचा पुरावा म्हणून आधी सेल्फी काढावा लागेल. त्यानंतर तो स्लेफी सिस्टममध्ये अपलोड करावा लागले. अशाच प्रकारे काम संपवतानाही काम संपवल्याचा पुरावा म्हणून सेल्फी अपलोड करावा लागणार आहे. हा अजब नियम सध्या पुण्यातील पोलिसांमध्ये (Pune Traffic Police) चर्चेचा विषय ठरतोय.

शनिवारपासून पुणे शहरातील वाहतूक पोलिसांसाठी हा नवा नियम जारी करण्यात आला आहे. हजेरी लावण्यासाठी वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांना आता या पद्धतीने आपली कामावरची हजेरी सिद्ध करावी लागणार आहे.

नव्या यंत्रणेनुसार, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना 8.30 ते 9 वाजम्याच्या दरम्यान सेल्फी काढून आपण कामावर हजर झालेलो आहोत, हे दाखवावं लागेल. त्यानंतर सकाळी, दुपारी आणि संध्याकाळीही असंच करावं लागणार आहे. काम संपवानाताही त्यांना हीच पद्धत अवलंबावी लागेल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

ड्युटी साईन इन आणि ड्युटी साईन ऑफ करण्याची ही नवी पद्धत टिपीकल पुणे स्टाईलची असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीमाने यांनी म्हटलंय की..

विभागीय कार्यलयाला रिपोर्ट करण्याऐवजी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट ट्रॅफिक जंक्शनवर जाऊन रिपोर्ट करावं. त्यासाठी त्यांना हजेरी लावताना अडचण येऊ नये म्हणून हा नवा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे वेळ वाचेल आणि जास्त काम होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो आहे.

पुणे पोलिसांसाठी एक मोबाईल एप्लिकेशन तयार करण्यात आलं आहे. या एप्लिकेशनच्या माध्यमातून फोटो अपलोड करावा लागणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक तोडरमळ यांनी दिलीय. प्रत्येक तासाला एक सेल्फी अपलोड करुन रिपोर्टींग करावं लागेल, असंही त्यांनी म्हटलंय.

पुणे वाहतूक पोलीस दलात एकूण 950 कर्मचारी आहेत. त्यातील 800 जण नियमित ड्युटीवर असतात. या नव्या नियमामुळे पुणे वाहतूक पोलिसांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. या नव्या नियमाला आता कसा प्रतिसाद मिळतो, हा नियम फायदेशीर ठरतो की तोट्याचा ठरतो, हेही आता येत्या काळात स्पष्ट होईल.

सतत सेल्फी पोस्ट करण्याची कल्पना चांगली जरी असली, तर त्याचा अर्थ हा कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखवल्यासारखा तर होणार नाही ना, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे. तर काहींनी सेल्फी अपलोड करण्याची मर्यादा घटवली जावी, असंही म्हटलंय.