पुण्यात टेकडीजवळची भिंत कोसळली; ढिगाऱ्याखाली एकजण सापडून जखमी; अग्निशमनकडून ढिगारा काढण्याचे काम सुरु

पुण्यात टेकडीजवळची भिंत कोसळली; ढिगाऱ्याखाली एकजण सापडून जखमी; अग्निशमनकडून ढिगारा काढण्याचे काम सुरु
पुण्यात भिंत कोसळून एक जण जखमी
Image Credit source: tv9 marathi

अग्निशमनच्या जवानांनी शोधमोहीम हाती घेतली, मात्र त्यांना इतर कुणीही व्यक्ती ढिगार्‍याखाली असल्याचे निदर्शनास आले नाही. तसेच भिंतीखाली आणखी कुणी नसल्याचे अग्निमशनच्या अधिकार्‍यांनी जखमी व्यक्तीच्या मार्फत खात्री केली.

महादेव कांबळे

|

May 27, 2022 | 1:48 AM

पुणेः कोथरूड भागातील (Kothrud Area) रामबाग कॉलनीच्या हॉटेल पालवीच्या (Hotel Palvi) मागे टेकडीवर जाणार्‍या पायर्‍या लगतची भिंत कोसळून एक व्यक्ती जखमी (One person injured wall collapsed) झाल्याची घटना घडली आहे. जखमीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. भिंत कोसळून दुर्घटना घडल्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भिंत कोसळली त्यावेळी नागरिकांमध्ये प्रचंड मोठे भीतीचे वातावरण पसरले होते.

भिंत कोसळून दुर्घटना घडल्यानंतर काही काळ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. भिंतीखाली नागरिका सापडल्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र नागरिकांनी तात्काळ मदत कार्याला सुरुवात केल्याने भिंतीखाली सापडलेल्या व्यक्तीला तात्काळ रुण्गालयात दाखल करण्यात आले.

भिंतीली मातीचा भार जास्त

टेकडीवर जाणार्‍या पायर्‍यालगतची भिंतीली मातीचा भार जास्त झाला होता. त्यामुळे गुरूवारी संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळली. भिंत कोसळताच या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला सांगण्यात आली. त्यानंतर अग्निशमन विभागाला माहिती समजताच कोथरूड अग्निशमनच्या अधिकारी व जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पुर्वी स्थानिकांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले होते.

जखमी व्यक्तीच्या मार्फत खात्री

अग्निशमनच्या जवानांनी शोधमोहीम हाती घेतली, मात्र त्यांना इतर कुणीही व्यक्ती ढिगार्‍याखाली असल्याचे निदर्शनास आले नाही. तसेच भिंतीखाली आणखी कुणी नसल्याचे अग्निमशनच्या अधिकार्‍यांनी जखमी व्यक्तीच्या मार्फत खात्री केली. जखमीच्या डोक्याला, पाठीला, हाताला मार लागला असून त्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

वीस ते पंचवीस फूट लांब भिंतीचा भाग कोसळला

जवळपास वीस ते पंचवीस फूट लांब भिंतीचा भाग कोसळला असून आणखी काही भिंत पडण्याची शक्यता अग्निशमनचे अधिकारी गजानन पाथरूडकर यांनी दिली. सध्या भिंत एका विद्युत खांबाला अडकून राहिली आहे. महापालिकेच्या आपत्तीव्यवस्थापन विभागाला माहिती देण्यात आली असून सर्व भिंत काढून घेण्यास अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें