Pune metro | पुणेकरांनो मट्रोचे तिकीट करा ‘ऑनलाईन बुक’ ; मट्रो प्रशासनाकडून ॲपची निर्मिती

| Updated on: Mar 10, 2022 | 1:40 PM

गेल्या तीन दिवसात तब्बल एका लाखाहून अधिक प्रवाश्यांनी प्रवास केला आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्याचे प्रशासनाने निश्चित केलं आहे.या ॲपच्या माध्यमातून एकावेळी दहा तिकिटे काढता येणार आहे.

Pune metro | पुणेकरांनो मट्रोचे तिकीट करा ऑनलाईन बुक ; मट्रो प्रशासनाकडून ॲपची निर्मिती
Pune Metro
Image Credit source: TV9
Follow us on

 पुणे- शहरात वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या मेट्रोच्या (metro)12किमीचे नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते उदघाट्न झाले. उद्घटनानंतर मेट्रोला पुणेकरांनी जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी महामेट्रो प्रशासनाने ‘पुणे मेट्रो ॲपची’ निर्मिती केली आहे. या ॲपमुळे(App) नागरिकांना तिकिटासाठी रांगेत न थांबता घर बसल्या तिकीट काढता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रवाश्यांना फिडर सुविधेची माहितीसह मेट्रोचे वेळापत्रकही उपलब्ध होणार आहे. गेल्या तीन दिवसात तब्बल एका लाखाहून अधिक प्रवाश्यांनी प्रवास केला आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्याचे प्रशासनाने निश्चित केलं आहे.या ॲपच्या माध्यमातून एकावेळी दहा तिकिटे काढता येणार आहे. नागरिकांना हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे.  हे तिकिट क्‍यू आर कोडच्या (QR Code) स्वरूपात असून त्यासाठी प्रवाशांना हे ऍप डाऊनलोड करावे लागणार असून त्यावर वैयक्‍तिक माहिती देऊन नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे.

प्रवासी क्षमता इतकी

पुणे व पिंपरी चिंचवड येथील मेट्रोचे तीन डब्बे असणार आहे. यामध्ये एका डब्यात 325 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. एका वेळी तब्बल 975 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. यामधी एक डबा महिलांसाठी राखीव असणार आहे. पुणेमेट्रो पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेजमार्गावरील मेट्रोचा कालावधी 13तासांचा आहे सकाळी 8 ते रात्री 9वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

 

sun transit | 15 मार्चला होणार सूर्याचे राशी परिवर्तन, या 4 राशींच्या लोकांना मिळणार घवघवीत यश

आहे की नाही Creativity! चक्क हवेत तरंगतेय चहाची किटली! कशी काय? ‘हा’ Video पाहा

IPL 2022: पैसाच पैसा! यंदा नुसत्या स्पॉन्सरशिपमधून BCCI ची रग्गड कमाई; आकडा वाचून चमकतील डोळे