AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ankush Kakade | पुण्याचा पाणीप्रश्न तापला ; गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली – अंकुश काकडे

आयुक्‍तांच्या बंगल्यावर जाऊन तेथे किती दाबाने पाणी येते, हे आम्ही पाहणार आहोत. पाणीपुरवठ्याबाबत आम्ही आज मुद्दे मांडले. त्यावेळी केवळ सुधारण करतो, असे उत्तर मिळते. मात्र जीव गेल्यावर सुधारण करणार का? तीन दिवसांत पाणीपुरवठा सुधारला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू

Ankush Kakade | पुण्याचा पाणीप्रश्न तापला ; गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली - अंकुश काकडे
गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागलीImage Credit source: TV9
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Mar 28, 2022 | 1:57 PM
Share

पुणे – पाणी प्रश्नावरुन पुण्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat)हे कालवा समितीच्या बैठकीतून तावातावात बाहेर पडले होते. ‘आयुक्तांच्या घरी पाण्याचे प्रेशर चांगलं, पण त्यांना इतर प्रेशरच जास्त’ असा टोला गिरीश बापट यांची लगावला होता. यावरुन आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये (NCP and BJP) आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी गिरीश बापटांवर निशाणा साधला आहे. “गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली ” असा प्रश्न अंकुश काकडे(Ankush Kakade) यांनी उपस्थित केला आहे.

योग्य व्यवस्थापन करा

दुसरीकडं पुणे खडकवासला प्रकल्पात गतवर्षीपेक्षा 2.5 टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे यंदा जलसंपदा, महानगरपालिका प्रशासनाने पाणीबचतीसाठी योग्य व्यवस्थापन करा. शहरात तसेच ग्रामीण भागातही कालव्यावर कोठे काही पाणीचोरी होत असेल, गळती होत असेल तर कठोर कारवाई करावी. सर्वांना समान न्यायाने पाणी मिळेल असे व्यवस्थापन करावे.अश्या सूचना उपमुख्यामंत्री तथा जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत .

गिरीश बापट यांचे आरोप

लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. काही अधिकारी पाणी सोडणाऱ्यांवर दबाव आणून पाणीपुरवठा कमी-अधिक प्रमाणात सोडत आहे. हे दबावतंत्र नक्की टॅंकर लॉबीसाठी, की अन्य कोणासाठी? आयुक्‍तांच्या बंगल्यावर जाऊन तेथे किती दाबाने पाणी येते, हे आम्ही पाहणार आहोत. पाणीपुरवठ्याबाबत आम्ही आज मुद्दे मांडले. त्यावेळी केवळ सुधारण करतो, असे उत्तर मिळते. मात्र जीव गेल्यावर सुधारण करणार का? तीन दिवसांत पाणीपुरवठा सुधारला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्याचे नेतृत्व मी करेन. असे गिरीश बापट, खासदार यांननी म्हटले होते.

Nashik | पोलीस आयुक्तावर दबाब आणणे अयोग्य, ट्रान्सफर होईपर्यंत आदेश मागे नाही; नववर्ष स्वागत समितीला पांडेय यांचे उत्तर

महाराष्ट्रात 2024 ला बहुमताचं सरकार येणार, Devendra Fadnavis यांचा गोव्यातून मविआला इशारा

VIDEO: धर्मेंद्र प्रधान यांच्या स्वप्नातली रिफायनरी Nanarमध्ये नक्कीच होणार नाही: विनायक राऊत

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली