‘आयुक्तांच्या घरी पाण्याचे प्रेशर चांगलं, पण त्यांना इतर प्रेशरच जास्त’, गिरीश बापट यांची टोलेबाजी

'आयुक्तांच्या घरी पाण्याचे प्रेशर चांगलं, पण त्यांना इतर प्रेशरच जास्त', गिरीश बापट यांची टोलेबाजी
गिरीश बापट, खासदार, भाजप
Image Credit source: TV9

येत्या तीन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुधारला नाही, तर नागरिक रस्त्यावर येतील, असा इशाराही गिरीश बापट यांनी कालच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देऊन सभात्याग केला होता. त्यानंतर आज गिरीश बापट यांनी पुण्याच्या पाणीप्रश्नावर आक्रमक होत थेट आयुक्तांच्या घरावर धडक मारली.

योगेश बोरसे

| Edited By: सागर जोशी

Mar 27, 2022 | 10:16 PM

पुणे : पाणी प्रश्नावरुन सध्या पुण्यातील (Pune) राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांनी आज थेट आयुक्त विक्रम कुमार यांच्या घरावर धडक देत त्यांच्या घरातील पाण्याचं प्रेशर तपासलं. आयुक्तांच्या घरातील पाण्याचं प्रेशर ठीक आहे पण त्यांना इतर प्रेशर खूप असल्याचा टोला गिरीश बापट (Girish Bapat) यांनी लगावलाय. बापट यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारच्या दबावाखाली आयुक्त काम करत असल्याचा आरोप केलाय. पुणे शहरात कसबा, नाना पेठेसह अन्य भागांमध्ये कमी-जास्त दाबाने पाणीपुरवठा होत आहे. येत्या तीन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा (Water Supply) सुधारला नाही, तर नागरिक रस्त्यावर येतील, असा इशाराही गिरीश बापट यांनी कालच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देऊन सभात्याग केला होता. त्यानंतर आज गिरीश बापट यांनी पुण्याच्या पाणीप्रश्नावर आक्रमक होत थेट आयुक्तांच्या घरावर धडक मारली.

पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी टेक्निकल टीम नेमली जाणार

बापट यांनी आज थेट आयुक्तांच्या घरातील पाण्याचं प्रेशर तपासले. शहरात सर्वत्र समान पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर शहरात महापालिका 5 झोन तयार करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी टेक्निकल टीम नेमण्यात येणारं आहे. त्यांचे संपर्क क्रमांकही लवकर घोषित करेल. तसंच या सर्वांवर एक अतिरिक्त आयुक्त लक्ष ठेवतील, अशी माहितीही बापट यांनी दिलीय. शहरामध्ये 24 तास पाण्याच्या लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. सर्वपक्षीय नगरसेवक यासाठी सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. पुढील दोन दिवसात पाणी प्रश्न काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा बापट यांनी यावेळी व्यक्त केली.

पाणी प्रश्नावरुन गिरीश बापट यांचा सभात्याग

‘पाण्याचं प्रेशर तपासायला आले आणि चहा-पाणी करुन गेले’

गिरीश बापट यांनी काल कालवा समितीच्या बैठकीतून तावातावात बाहेर पडले होते. तसंच आपण आयुक्तांच्या घरातील पाण्याचं प्रेशर चेक करायला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. शहरातील पाणीपुरवठा सुधारला नाही तर नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, आज आयुक्तांच्या घरी पोहोचताना बापटांचा सूर बदलेला दिसला. आपलं आंदोलन हे आयुक्तांच्या विरोधात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि काही मोजके नगरसेवक घेऊन बापट यांनी आयुक्तांच्या बंगल्यात प्रवेश केला. यावेळी माध्यम प्रतिनिधींना मी निरोप दिल्यावर आत या असं बापट म्हणाले. मात्र, अर्धा तासात आयुक्तांचा पाहुणचार घेऊन बापट बाहेर आले. त्यामुळे ‘पाण्याचं प्रेशर तपासायला आले आणि चहा-पाणी करुन गेले’, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

इतर बातम्या : 

‘भाजपच्या सत्तेच्या काळातच काश्मिरी पंडितांचं विस्थापन’, पवारांचं वक्तव्य; विद्वेषाचं राजकारण सुरु असल्याचाही आरोप

Video : मी तिजोरी नाही उघडली तर काय देणार “घंटा”? अजित पवारांची गाडी पुन्हा घसरली, मान्यही केलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें