राज्यात जाती-पातीच्या राजकारणामागे कारण काय? राज ठाकरे यांनी असे काढले माप

Raj Thackeray MNS : राज्यात जाती-पातीच्या राजकारण सुरू आहे. डोकी फुटत आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर आसूड ओढला. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार फटकेबाजी केली.

राज्यात जाती-पातीच्या राजकारणामागे कारण काय? राज ठाकरे यांनी असे काढले माप
राज ठाकरे यांचा आसूड
Image Credit source: मनसे सभा
| Updated on: Mar 09, 2025 | 12:23 PM

राज्यात जाती-पातीच्या सुरू असलेल्या राजकारणावर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदास आसूड ओढला. त्यांनी राजकारणाचा चिखल झाल्याचे म्हटले. सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी विविध मुद्दावर त्यांचे मत मांडले. तर यावेळी त्यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी मेळाव्याला येण्याचे आवाहन केले.

राजकारणाचा चिखल झाला

आज राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. मते मिळवण्यासाठी तुमची डोके फोडून घेतात, आग लावतात हे आपल्या लोकांना समजत नाही, असा आसूड त्यांनी ओढला. पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात त्यांनी राज्यातील सध्य स्थितीवर टीका केली. लोकांची माथी भडकवण्याचे काम करण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सध्याच्या या परिस्थितीवर आपण गुढी पाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. या सर्व गोष्टीकडून तुम्हाला गुमराह करण्यासाठी जातीपातीचे विषय काढले जात आहे. सोशल मीडियातून तुमची टाळकी भडकवले जात आहेत. जाणून बुजून हे उद्योग सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

गुढीपाडव्याला दांडपट्टा चालवणार

२० दिवसांवर गुढी पाडव्याचा मेळावा आहे. तिकडे मी दांडपट्टा फिरवणार असेल तर आता चाकू सुरे कशाला काढू, असा सूचक इशारा राज ठाकरे यांनी दिला. आज मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. सदानंद मोरे सरांनी आताच्या परिस्थितीवर बोलावं म्हणून त्यांना बोलावलं. त्यांची व्याख्याने राज्यभर ठेवणार असल्याचे ते म्हणाले.

वरळी सी लिंकच्या कामावर चिमटा

प्रभू रामचंद्रांना जेव्हा वनवास झाला. १४ वर्षाचा झाला असे सांगत या काळात काय काय घडलं, याची माहिती देत राज ठाकर यांनी हळूच जोरदार चिमटा काढला. त्यामुळे सभेत एकच खसखस पिकली. प्रभू रामचंद्रांना हनुमान भेटला. लंकेत गेले. कुंभकर्णाला मारलं. रावणाला मारलं. सीतामाईला घेऊन आयोध्येला आले. मध्ये त्यांनी एक सेतू बांधला. हे त्यांनी १४ वर्षात केलं. आणि वांद्रे वरळी सी लिंक आपण १४ वर्षात बांधला. कुठे आयोध्या, दंडकारण्य, कुठे लंक सेतूबितू बांधून गेले. हे सर्व १४ वर्षात घडलं असं सांगत आजच्या काळात वांद्रे वरळी सी लिंकला 14 वर्षे लागल्यावरून त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.