पुण्याने रचना लसीकरणाचा नवा रेकॉर्ड! एका दिवसात टोचले तब्बल 2 लाख डोस, लसीकरणात देशात अव्वल

| Updated on: Aug 31, 2021 | 6:04 PM

पुणे जिल्ह्याने (Pune) कोरोना लसीकरणामध्ये (Corona Vaccination) आज एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. आज एका दिवसात पुणे जिल्ह्यात तब्बल 2 लाख डोस देण्यात आले आहेत. यासोबतच जिल्ह्यात आतापर्यंत लसीकरण झालेला आकडा 80 लाखांच्या घरात गेला आहे.

पुण्याने रचना लसीकरणाचा नवा रेकॉर्ड! एका दिवसात टोचले तब्बल 2 लाख डोस, लसीकरणात देशात अव्वल
कोरोना लसीकरण.
Follow us on

पुणे : पुणे जिल्ह्याने (Pune) कोरोना लसीकरणामध्ये (Corona Vaccination) आज एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. आज एका दिवसात पुणे जिल्ह्यात तब्बल 2 लाख डोस देण्यात आले आहेत. यासोबतच जिल्ह्यात आतापर्यंत लसीकरण झालेला आकडा 80 लाखांच्या घरात गेला आहे. अशी कामगिरी करणारा पुणे देशातला एकमेव जिल्हा ठरला आहे. आज पुण्याच्या ग्रामीण भागात आज लसीकरणाने उच्चांक गाठला. जिल्हा परिषदेला सीएसआर फंडातून दीड लाख डोस मिळाले होते. त्यामुळे एका दिवसात लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पार करणं शक्य झाल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटलं आहे. (Record-breaking 2 lakh corona doses have been given in one day in Pune district today)

ऑगस्टमध्ये चौथ्यांदा लाखाच्या वर लसीकरण

ऑगस्ट महिन्यात चौथ्यांदा लसीकरणाने एक लाखाचा आकडा ओलांडला आहे. याआधीगेल्या आठवड्यात गुरुवारी दिवसभरात एक लाख 15 हजार जणांचे लसीकरण करण्यात आलं होतं. राज्यात झालेल्या एकूण लसीकरणापैकी 20 टक्के लसीकरण हे एकट्या पुणे विभागात झाले आहे त्यातही पुणे विभागातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लसीकरण हे पुणे जिल्ह्यात झाले आहे.

पुणे शहरात 30 लाखांचा टप्पा पार

पुणे शहरानेही कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) मोहीमेत एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पुण्यात 30 लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस देण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. पुणे शहरात कालपर्यंत 31 लाख 83 हजार 542 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. काल एका दिवसात पुणे शहरात 64 हजार 646 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं.

जिल्ह्यात हॉटस्पॉट गावांची संख्या पुन्हा शंभरीपार!

पुणे (Pune) जिल्ह्याच्या ग्रामीण (Pune Rural) भागात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याचं दिसत आहे. गेले दोन आठवडे आटोक्यात असलेल्या कोरोनाने या आठवड्यात पु्न्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या आठवड्यात कमी झालेल्या हॉटस्पॉट (Hotspot) गावांची संख्या पुन्हा वाढली आहे. पुणे जिल्ह्यातल्या गेल्या आठवड्यात 95 गावं हॉटस्पॉट होती, त्यांची संख्या आता पुन्हा वाढून 103 वर गेली आहे. सध्या पुणे ग्रामीणमध्ये 3.6 टक्के बाधित दर आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला 100 गावांमध्ये 10 पेक्षा जास्त कोरोनारुग्णांची संख्या होती. त्यानंतर यामध्ये घट होऊन 95 गावं हॉटस्पॉट राहिली. मात्र, आता जिल्ह्यातल्या हॉटस्पॉट गावांची संख्या पुन्हा शंभरीपार गेली आहे. सध्या जिल्ह्यात 103 गावांमध्ये 10 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे अशा गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आणि लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.

धडक सर्वेक्षण मोहीमेमुळे कोरोना दर आटोक्यात

पुणे आरोग्य प्रशासनाने धडक सर्वेक्षण मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेचा ग्रामीण भागातला कोरोना दर आटोक्यात आणण्यात मोठी मदत झाली. त्यानंतर जिल्ह्याचा कोरोनाबाधित दर पाच टक्क्यांच्या आली आल्यामुळे पुणे (Pune), पिंपरी चिंचवडसह (Pimpri Chinchwad) ग्रामीण भागात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

इतर बातम्या :

Weather Update : पालघरला रेड ॲलर्ट, मुंबईसह कोकण ते उत्तर महाराष्ट्रात मुसळधार, IMD कडून नवा अंदाज जारी

Gold Rate Today : सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त, किंमत खूप कमी, वाचा ताजे दर

Tokyo Paralympics मध्ये भारताची उंच उडी, एकाच स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदक भारताच्या पठ्ठ्यांना!