कोरोना रोखण्यासाठी रिटायर्ड आर्मी मैदानात; सांगली महापालिकेचा अनोखा फंडा

| Updated on: Feb 27, 2021 | 7:58 PM

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी आणि कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सांगली-मिरज-कुपवाडा महापालिकेने अनोखा फंडा अवलंबला आहे. (retired army officer will help sangli corporation for Coronavirus Prevention)

कोरोना रोखण्यासाठी रिटायर्ड आर्मी मैदानात; सांगली महापालिकेचा अनोखा फंडा
माजी सैनिक
Follow us on

सांगली: जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी आणि कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सांगली-मिरज-कुपवाडा महापालिकेने अनोखा फंडा अवलंबला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सांगली महापालिकेने थेट सैन्यातील निवृत्त सैनिकांनाच मैदानात उतरवले आहे. हे वर्दीतील माजी सैनिक रस्ते, बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. (retired army officer will help sangli corporation for Coronavirus Prevention)

सांगलीत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईसाठी महापालिकेकडून माजी सैनिकांची टास्क फोर्स नियुक्त करण्यात आली आहे. हे माजी सैनिक कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. यासाठी 15 माजी सैनिकांच्या एका तुकडीकडून कारवाईला सुरुवातही करण्यात आली आहे. या माजी सैनिकांनी सांगलीच्या बाजारपेठेत फेरफटका मारत नागरिकांना मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले.

15 माजी सैनिकांची तुकडी

वाढता कोरोना पाहता सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून आता सांगलीत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात माजी सैनिकांची मदत महापालिका घेत आहे. 15 माजी सैनिकांची एक तुकडी यासाठी महापालिकेने सज्ज केली असून हे माजी सैनिक आपल्या लष्करी वेशामध्ये नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. याचबरोबर विनामास्क दिसणाऱ्या प्रत्येकावर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाणार असून शनिवारपासून हे 15 माजी सांगलीत कारवाईसाठी बाहेर पडले आहेत. हे माजी सैनिक दररोज सांगलीत कोरोना नियमांचा भंग करणाऱ्यावर कारवाई करणार आहेत, अशी माहिती सांगली पालिकेचे अस्थापना अधिकारी अनिल चव्हाण यांनी दिली.

बाजारात फेरफटका

वर्दीमधील या माजी सैनिकांची एक-एक तुकडी शहरातील बाजारपेठा, गर्दीची ठिकाणी आदी परिसरात फिरत आहेत. त्यांच्यासोबत असलेला एक व्यक्ती मेगा फोनद्वारे नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचं आव्हान करत असतो. तर बाकीचे माजी सैनिक येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांना तोंडाला मास्क लावण्याच्या सूचना करताना दिसत आहेत.

राज्यातील आजचा कोरोना रुणांचा आकडा

गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 8 हजार 623 रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासात 3 हजार 648 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
गेल्या 24 तासात 51 जणांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांचा आकडा 21 लाख 46 हजार 777 वर
आतापर्यंत कोरोनामुळे 52 हजार 92 जणांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत एकूण 20 लाख 20 हजार 951 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. (retired army officer will help sangli corporation for Coronavirus Prevention)

 

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, ठाकरे सरकारमधील मंत्र्याची मोठी घोषणा

LIVE | राज्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात 8 हजार 623 रुग्णांची नोंद

कोरोनाचा कहर वाढला; महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश बंदी!

(retired army officer will help sangli corporation for Coronavirus Prevention)