Baramati : चालत्या दुचाकीवर सुर्यनमस्कार करणाऱ्या बारामतीच्या रोहित शिंदेची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद

सन 2018 मध्ये मोटार सायकल रायडींगमध्ये रोहित महाराष्ट्रात पहिला व केरळमध्ये देशात तिसरा आला होता तर सन 2019 मध्ये हैद्राबाद मध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता.

Baramati : चालत्या दुचाकीवर सुर्यनमस्कार करणाऱ्या बारामतीच्या रोहित शिंदेची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद
pune baramati rohit shinde
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 11, 2023 | 9:54 AM

बारामती : 14 जानेवारी जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त चालू मोटारसायकलवर 20 सेकंदामध्ये सुर्यनमस्कार (Surya Namaskar) घातले, म्हणून रोहित दिलीप शिंदे (rohit dilip shinde) यांची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद (Asia Book Records) करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याची राज्यात सुध्दा चर्चा सुरु झाली आहे. मोटार सायकलवर 10 वेळा सुर्यनमस्कार काढणारा जगातील पहिला तो मोटार सायकल रायडर आहे. तो वयाच्या 16 वर्षापासून मोटार सायकल रेस करीत आलेला आहे.
गेल्या 12 वर्षापासून मोटार सायकल रायडींग करून आतापर्यंत 300 हून अधिक मोटार सायकल रायडिंग शोमध्ये तो सहभागी झाला आहे. मोटार सायकल रायडींग करणे हा स्वत:पुरता मर्यादीत राहिलेला नसून त्याने अनेक इच्छुक युवकांना मोटार सायकल रायडींगचे प्रशिक्षण सुरुवात केल्याची माहिती त्याने दिली आहे.

याकारणामुळे रेसिंग नॅशनल स्पर्धेसाठी रोहितची निवड

मोटार सायकल स्टंटमध्ये मोटोक्रॉस, स्टंट रायडींग ऑफ रोडींग, ऍटोक्रॉस आणि रॅलीमध्ये उत्तुंग कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या झारखंडमधील रांची येथे मोटार सायकल रायडींगमध्ये प्रथम क्रमांक मिळवून नावलौकीक केलेला आहे. त्यामध्ये देशातील 70 रायडरने भाग घेतला होता. केटीएम कंपनीच्या आरसी 390 सीसी गाडीवर रेस जिंकून चेन्नई येथे होणार्‍या ट्रॅक रेसिंग नॅशनल स्पर्धेसाठी रोहितची निवड झालेली आहे. यामध्ये प्रथम दहामध्ये येणार्‍यास ऑस्ट्रिया केटीएम ग्लोबल हेडक्वॉटर स्पर्धेत भाग घेता येणार आहे असे बजाज ऍटो लि.चे अध्यक्ष सुमित नारंग यांनी सांगितले.

रोहित महाराष्ट्रात पहिला व केरळमध्ये देशात तिसरा आला

सन 2018 मध्ये मोटार सायकल रायडींगमध्ये रोहित महाराष्ट्रात पहिला व केरळमध्ये देशात तिसरा आला होता तर सन 2019 मध्ये हैद्राबाद मध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. यापूर्वी तामिळनाडू कोईमतूर मध्ये झालेल्या मोटार सायकल रायडींगमध्ये वेगवेगळ्या तीन स्पर्धेमध्ये रेकॉर्ड करून बारामतीतील रोहित दिलीप शिंदे यांनी देशात पहिला क्रमांक मिळविला होता. सीआरएफ कंपनीने स्टंट वॉलफेअर राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये फ्री स्टाईल स्टंट रायडींग ऑबस्टूकल टाइम चॅलेंज व लास्ट मॅन स्टँडींग या तिन्ही स्पर्धामध्ये रोहितने अव्वलस्थान पटकाविले होते.

तिन्ही स्पर्धेत एकत्रित रेकॉर्ड करणारा रोहित शिंदे हा स्टंट रायडिंगमध्ये पहिला

मोटारसायकल एका चाकावर उचलून जास्तीत जास्त गाडी गोल फिरविण्याची स्पर्धा होती. केवळ 8 मी. 28 सेकंड एवढ्या कालावधीत तिन्ही स्पर्धेत रेकॉर्ड केले होते. तिन्ही स्पर्धेत एकत्रित रेकॉर्ड करणारा रोहित शिंदे हा स्टंट रायडिंगमध्ये पहिला खेळाडू ठरला आहे.