सांगलीच्या आवंढीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 23 जनावरांचा मृत्यू

| Updated on: Jan 25, 2021 | 6:38 PM

सांगलीच्या जत तालुक्यातील आवंढी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. (23 pet animals died due to dog bite )

सांगलीच्या आवंढीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 23 जनावरांचा मृत्यू
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

सांगली: सातारा जिल्ह्या पाठोपाठ सांगली जिल्ह्यातही पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील आवंढी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी परिसरात धुमाकूळ घातला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक जनावरांना चावा घेतला आहे. पशूवैधकीय अधिकाऱ्यांना याबाबत कळवूनही वेळेत रेबिजची लस दिली नसल्याने या जनावरांचा मुत्यू झाला असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. (Sangli Avandhi village 23 pet animals died due to dog bite )

आतापर्यंत 23 जनावरांचा मृत्यू

आवंढीत गेल्या आठवड्यात काही पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकुळ घातला होता.या कुत्र्यांनी गावातील एक बैल, पाच गायी, त्यांची चार लहान पिले, आणि म्हैसींचा चावा घेतला. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी आवंढी पशूवैद्यकीय डॉक्टराना याबाबत माहिती दिली. मात्र, वेळेत उपचार झाले नाहीत.आणखी काही जनावरांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यांनाही रेबिज झाल्याचा संशय आहे. जनावरांना लवकरात लवकर लसीकरण केले नाही तर ती देखील दगावण्याचा धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत 23 जनावरं दगावली आहेत.

दरम्यान, शासनाने लाखो रुपये खर्चून आवंढी येथे श्रेणी 1 दर्जाच्या दवाखान्याची प्रशस्त इमारत बांधली आहे.मात्र, या दवाखान्याला कायमस्वरूपी डॉक्टर मिळालेला नाही. कित्येक वर्षापासून प्रभारी अधिकाऱ्यांकडे कारभार देण्यात आला आहे. परिणामी वेळेत उपचार होत नसल्याने जनावरांचा डोळ्यादेखत मुत्यू होताना शेतकऱ्यांना पाहावं लागत आहे. या प्रकाराची चौकशी करून संबधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

जत पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागानं आवंढी गावाला भेट दिली. पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या जनावरांना लसीकरण केले होते. पण, जनावरांच्या मानेला आणि डोक्याला चावा घेतल्यानं ती जनावरं जगू शकलं नाहीत. पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणं गरजेचे असल्याच्या सूचना ग्रामपंचयातीला दिल्याचं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आवंढी गावातील जितकी जनावरं दगावली आहेत त्याबाबतची नुकसानभरपाई मिळण्याबाबत प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येतील, असंही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्यांच्या घरातील जनावर दगावली असतील त्यांनी सरकारी दवाखान्यात जाऊन रेबिज प्रतिबंधक लस घेणं गरेजेचे आहे, असं आवाहन देखील केले आहे.

साताऱ्यात दोघांचा मृत्यू

सातारा शहराजवळ असणारया जकातवाडी आणि डबेवाडी गावात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांना चावा घेतल्यामुळे यामधील जखमी झालेल्या 21 वर्षीय तरुणी रुपाली माने आणि 23 वर्षीय तरुण देवानंद लोंढे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मागील 15 दिवसांपुर्वी पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 10 ते 15 जण जखमी झाले आहेत या पैकी 5 जणांवर अजून ही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या:

साताऱ्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, रेबीजवर औषध न मिळाल्याने दोघांचा मृत्यू

भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी?, आंदोलनात लोकं घुसवली; प्रवीण दरेकरांची टीका

(Sangli Avandhi village 23 pet animals died due to dog bite )