फायनली…पुणे-पिंपरी चिंचवडमधील शाळा उत्साहात सुरू, कोणते नियम पाळावे लागणार?

पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्रामधील (schools) इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांच्या अधिन राहून शहर क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा सुरू करण्यासंदर्भात महापालिकांनी परवानगी दिली आहे.

फायनली...पुणे-पिंपरी चिंचवडमधील शाळा उत्साहात सुरू, कोणते नियम पाळावे लागणार?
School
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 11:47 AM

मुंबई : पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्रामधील (schools) इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांच्या अधिन राहून शहर क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा सुरू करण्यासंदर्भात महापालिकांनी परवानगी दिली आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये ही मोठ्या उत्साहात 1 ते 7 सातवी चे वर्ग सुरू झाले आहेत. मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी शिक्षकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

पुणे-पिंपरी चिंचवडमधील 1 ते 7 चे वर्ग सुरू

पिंपरी-चिंचवडमधील महापालिका शाळा सुरू झाल्या आहेत. मुलांचे औक्षण करून चॉकलेट देत शिक्षकांनी मुलांचे स्वागत केले आहे. शाळा उघडण्यापूर्वी शाळा प्रशासनाद्वारे आवश्यक नियोजन केले आहे. त्यानुसार ज्या शाळा अजूनही कन्टेन्मेट झोनमध्ये आहे त्या उघडू नये. तसेच जे विद्यार्थी, शिक्षक कन्टेन्मेट झोन क्षेत्रात राहतात. त्यांना शाळेत येण्याची अनुमती देऊ नये. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी कन्टेन्मेट झोन क्षेत्रात भेट देऊ नये. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हे नियम पाळावे लागणार

शाळेत स्वच्छता, निर्जंतुकीकरण, विषय सुविधा सुनिश्चित करण्यात आल्या आहेत. जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धतता शाळेत करण्यात आली आहे. ज्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले नाहीत. अशांना 48 तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळा दप्तरी शिक्षकांना ठेवावे लागणार आहे.

शिक्षकांचे लसीकरण आवश्यक 

शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. वर्ग खोली, स्टाफरुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी असेही नियमामध्ये सांगण्यात आले आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांना घ्यावी लागणार आहे. तरच विद्यार्थ्यांला शाळेमध्ये प्रवेश दिला जाईल. शाळेत गर्दी होणारे उपक्रम, खेळ, सामूहिक प्रार्थना हे देखील टाळावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

Bullock cart race| बैलगाडा शर्यतीबाबत उद्या सकारात्मक निकाल लागेल अशी आशा- आमदार महेश लांडगे

पिंपरी- चिंचवडचा पाणीप्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन ठरले ‘फुसका बार’; मोजक्याच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती