AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bullock cart race| बैलगाडा शर्यतीबाबत उद्या सकारात्मक निकाल लागेल अशी आशा- आमदार महेश लांडगे

बैलगाडा शर्यतीबाबत वकिलांनी चांगली बाजू मांडली. न्यायालयाने फार सहानुभूतीने आमचे म्हणणे घेतले आहे. खिलारचे महत्व, ही जात शर्यतीची असल्याचे म्हणणेही यावेळी मांडण्यात आले.

Bullock cart race| बैलगाडा शर्यतीबाबत उद्या सकारात्मक निकाल लागेल अशी आशा- आमदार महेश लांडगे
MLA Mahesh landge
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 5:54 PM
Share

पुणे – महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीबाबत आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी होती. आज सुनावणी दरम्यान मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. यावेळी बैलगाडा शर्यतीबाबतच्या नियमात महाराष्ट्रालाच का डावलेले जाते, असा युक्तिवाद यावेळी करण्यात आला. राज्यांच्या सीमांमुळे बैलांमध्ये कसा फरक पडू शकतो,असा मुद्दाही यावेळी मांडला गेला. ही सुनावणी हंगामी निकालासाठी पाच सदस्य खंडपीठापुढे सुनावणी होत नाही, तोपर्यंत अंतिम निकाल लागणार नाही,असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले. यावर उद्या सुनावणी होणार आहे.

सहानभूतीपूर्वक म्हणणे ऐकले बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालय सुनावणी असल्याने भाजपाचे आमदार महेश लांडगे दोन दिवसांपासूनच दिल्लीत तळ ठोकला आहे. याबाबत बोलताना ते ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सीनियर कौन्सिल ॲड. मुकुल रोहतगी बाजूमांडत आहेत. बऱ्याच दिवसांनी एक तासापेक्षा अधिक वेळ सुनावणी झाली. बैलगाडा शर्यतीबाबत वकिलांनी चांगली बाजू मांडली. न्यायालयाने फार सहानुभूतीने आमचे म्हणणे घेतले आहे. खिलारचे महत्व, ही जात शर्यतीची असल्याचे म्हणणेही यावेळी मांडण्यात आले. त्यामुळे उद्या यावर निर्णायक निकाल लागेल, अशी आशा आहे., असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले आहे.

शर्यत प्रेमींकडूनसकारात्मक निकालासाठी प्रार्थना बैलगाडा शर्यतप्रेमींकडून हा निकाल शेतकऱ्यांच्या बाजुने लागावा म्हणून प्रार्थना करीत आहेत.आमदार महेश लांडगे म्हणाले की, बैलगाडा शर्यत बंदीनंतर आजपर्यंत, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात संदर्भात काम करणाऱ्या अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या सदस्यांना राजकीय सामाजिक प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य केले व मदत केली. प्रसंगी संघटना व राज्यातील बैलगाडा मालकांना सोबत घेऊन वेळोवेळी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने केली व यातूनच एक राज्यव्यापी मजबूत संघटन उभे राहिले बैलगाडा शर्यत बंदी च्या विरोधात सर्व स्तरावर आवाज उठवला गेला. या सर्व घडामोडीनंतर बैलगाडा शर्यत प्रेमी, संघटना या सर्वांच्या संघर्षाला यश येईल, अशी अपेक्षा आहे.

Video | Shocking | Tragedy | गळफास घेण्याची एक्टिंग करताना स्टूलवरुन पडला आणि…

Travel Special : परदेशी नाही, भारतातील ‘ही’ शहरेही आकर्षक; जाण्याआधी विचार करा

Breaking : इम्पिरिकल डेटा गोळा झाल्यावरच निवडणूक घ्याव्यात, राज्य मंत्रिमंडळात प्रस्ताव, पुढे काय होणार?

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.