Sharad Pawar: पुणे तिथे काय उणे! शरद पवार म्हणतात, कोण कधी काय सांगेल याचा भरवसा नसतो

| Updated on: May 08, 2022 | 1:15 PM

Sharad Pawar: गिरीश बापट, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला यांची मैत्री महापालिकेत प्रसिध्द आहे.

Sharad Pawar: पुणे तिथे काय उणे! शरद पवार म्हणतात, कोण कधी काय सांगेल याचा भरवसा नसतो
पुणे तिथे काय उणे! शरद पवार म्हणतात, कोण कधी काय सांगेल याचा भरवसा नसतो
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे: कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पुण्याची नेहमीच चर्चा होत असते. पुण्याचा इतिहास, पुण्यातील शैक्षणिक क्रांती, पुण्यातील वातावरण, पुणेकरांचं तिरकसं बोलणं आणि पुणेकरांचा मदत करण्याचा स्वभाव या कोणत्या ना कोणत्या कारणाने पुणे नेहमीच चर्चेत असतं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनाही पुणेकरांचा (punekar) चांगलाच अनुभव आलाय. खुद्द पवारांनी पुणेकरांच्या या स्वभावावर भाष्य केलं आहे. एक गंमतीजमतीचा आठवणीचा असा हा आजचा सोहळा आहे. महापालिकेत काम करताना अनेक गमतीदार किस्से घडत असतात. कोणी कधी काय काम सांगेल याचा भरवसा नसतो, असं शरद पवारांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पुण्यात शिकत असताना महापालिकेत काय काम चालतं हे माहिती होत, नगरसेवकांशी माझा संपर्क असायचा, असंही सांगितलं. निमित्त होतं अंकुश काकडे (ankush kakde) लिखित ‘हॅशटॅग पुणे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी अभिनेते नाना पाटेकर, खासदार श्रीनिवास पाटील, गिरीश बापट, वंदना चव्हाण, उल्हास पवार आदी उपस्थित होते.

गिरीश बापट, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला यांची मैत्री महापालिकेत प्रसिध्द आहे. अनेक वेळा अनेक जागा पुण्यात आम्ही जिंकल्या. पण मला अजून लक्षात आलं नाही, गिरीश बापट कोठेही उभे राहतात अन् निवडून येतात. एकदा बापट कसब्यातून उभे राहिले, आम्ही ठरवलं यांच्यावर लक्ष ठेवायचं, पण ते काय आम्हाला शक्य झालं नाही. आता हे पुस्तक पाहिल्यावर याच कारण बापट अंकुश आणि शांतीलाल यांची मैत्री आहे की काय? असा संबध आहे का? असं वाटत, असं शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

रोजगार मिळवून देणारं शहर

यावेळी पवार यांनी बदलत्या पुण्यावरही कटाक्ष टाकला. त्या काळातलं पुणे आणि आजच पुणे फार बदललं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांची लोकसंख्या जवळपास 70 लाख आहे. एवढ्या लोकसंख्येच्या या जुळ्या शहरात अनेक प्रश्न आहेत. पुणे जिल्ह्यात वेगवेगळे छोटेमोठे 1 कोटी पेक्षा जास्त कारखाने आहेत. एका दृष्टीने पुणे जसं शैक्षणिक हब आहे, तसेच रोजगार उपलब्ध करुन देणार पुणे हे महत्वाचे शहर आहे, असंही त्यांनी सांगितलं.