शेतकरी म्हणाला, छाती फाडली तर पवार साहेबच दिसतील, पवारांनी असं काही केलं की हशाच पिकला; काय घडला किस्सा?

ज्येष्ठ नेते शरद पवार दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. जवळार्जुन गावात शेतकऱ्याच्या 'छाती फाडली तर पवारच दिसतील' या निष्ठा व्यक्त करणाऱ्या वाक्यावर, भाजपने दिलेल्या पत्रावरून पवारांनी हशा पिकवला.

शेतकरी म्हणाला, छाती फाडली तर पवार साहेबच दिसतील, पवारांनी असं काही केलं की हशाच पिकला; काय घडला किस्सा?
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 1:36 PM

ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या दुष्काळी भागाची पाहणी करत आहेत. गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. वयाच्या 86 व्या वर्षीही पवार रणरणत्या उन्हात शेताच्या बांधावर जात आहेत. तास न् तास बसून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत आहेत. त्यांची निवेदने स्वीकारत आहेत. प्रत्येकाला ऐकून घेत आहेत. तसेच त्यांना आश्वासने देऊन धीर देत आहेत. आज शरद पवार हे बारामती तालुक्यातील जवळार्जुन गावात होते. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधत असतानाच एक मजेदार किस्सा घडला.

बारामती तालुक्यातील जवळार्जुन गावात आल्यावर शरद पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळाची माहिती घेतली. चारा, पाणी, पिकं याची माहिती घेतली. अनेकांशी शेतीशी निगडीत समस्या मांडल्या. निवेदने दिली. काहींनी वैयक्तिक समस्याही मांडल्या. शेतकरी या समस्या मांडत असतानाच एक मजेदार किस्सा घडला. एका शेतकऱ्याने आपलं कुटुंब शरद पवार यांना किती मानतं, त्यांच्याशी आपण कसे एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तो शेतकरी म्हणाला, माझे वडील मला बारामतीला घेऊन जायचे. आमचे वडील म्हणायचे की, छाती फाडली तरी साहेबच दिसतील. शेतकऱ्याच्या या वाक्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. पण जराही वेळ न दवडता पवारांनी त्या शेतकऱ्याने भाजपच्या लेटरहेडवर दिलेले पत्रच सर्वांना दाखवले. त्यावर भाजपचे पक्षचिन्ह कमळ होते. हे पत्र उंचावत पवार म्हणाले, मग हे काय आहे? पवारांनी हा मिश्किल सवाल करताच यावर एकच हशा पिकला.

Loading...

मुख्यमंत्र्यांना भेटणार

यावेळी पवारांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं. येत्या 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्र्यांशी मी सविस्तर चर्चा करणार आहे. संपूर्ण कर्ज माफ करा, ही माझी मागणी आहे. शेती आणि शेतीसंबंधीत घेतलेले कर्ज, फळबाग आणि मोटरसाठी घेतलेले कर्ज संपूर्ण माफ केलं पाहिजे. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केलं पाहिजे. पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावेत. मंजुरीचे अधिकार तालुका पातळीवर देण्यात यावेत, आदी मागण्या मी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत, असं पवारांनी सांगितलं.

काही तालुक्यात दुष्काळ नाही

साधारणत: अडचणी काय आहेत? ते आपल्या सर्वांना माहिती आहे. गावाच्या लोकांनी कष्ट घेतले, आपल्या गावाच्या शिवार कसे बदलणार यासाठी कष्ट घेतलेत, आज राहणीमान बदलले आहे. पण दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे. त्यावर आपण काहीतरी मार्ग काढू. सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. पण काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला नाही. त्याबाबतही सरकारला बोलणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तुमच्या माझ्या हातात काही नाही

सर्वांच्या अडचणी काय आहेत आपल्याला माहित आहेत. मी सरकारमध्ये असताना या गावात तीन वेळा येऊन गेलो आहे. तुम्ही लोकांनी गाव बदलण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे गाव बदललेलं दिसत आहे. दुष्काळ असताना तुमच्या माझ्या हातात काही नाही, असं ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us