Pune crime : पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न फसला, दोन्ही चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पैशाची रक्कम पळवणाऱ्या चोरट्यांच्या (Thieves) मुसक्या शिरूर पोलिसांनी (Shirur police) आवळल्या आहेत. दोन आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक (Arrest) केली आहे. न्हावरे येथील बाळासाहेब खेडकर यांनी यासंबंधी तक्रार दिली आहे.

Pune crime : पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न फसला, दोन्ही चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पैशाची बॅग चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरांना घेऊन जाताना पोलीस
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 1:23 PM

शिरूर/पुणे : पैशाची रक्कम पळवणाऱ्या चोरट्यांच्या (Thieves) मुसक्या शिरूर पोलिसांनी (Shirur police) आवळल्या आहेत. दोन आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक (Arrest) केली आहे. कर्जाची रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असलेल्या व्यक्तीच्या हातातली बॅग हिसकावणाऱ्या आरोपींना पोलिसांनी आता अटक केली आहे. शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील बाळासाहेब खेडकर यांनी यासंबंधी तक्रार दिली आहे. न्हावरे येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ते आपल्या नातेवाईकांसह 7,13,000/- रू कर्जाची रक्कम भरण्यासाठी बँकेत जात होते. न्हावरे ते चौफुला डांबरी रोडने ते जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान ती पिशवी जबरदस्तीने ओढली असता फाटली. त्यामुळे काही रक्कम रस्त्यावर पडली. तर आरोपींच्या हाती जवळपास 70,000 रुपये लागले. मिळालेली रक्कम घेऊन त्यांनी पोबारा केला.

सापळा रचून अटक

याप्रकरणी बाळासाहेब खेडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासाची चक्रे फिरवत शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सापळा रचून या आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

आणखी वाचा :

Pune crime : कल्याणीनगरात टोळक्याची दहशत, एसआरए कॉम्प्लेक्समधल्या वाहनांची केली तोडफोड

Pimpri Chinchwad crime| पिंपरी पोलिसांची शक्कल ; चोरांच्या मदतीनेच उलगडल्या दहा घरफोड्या घटना

PMC | पुणे महापालिकेचे ‘झुकेगा नही साला’ धोरण ; पथारी व्यावसायिकांकडून नव्या दराने आकारणार शुल्क