Shocking | 2019 पासून पुण्यात घडतोय ‘बुली बाईचा’ धक्कादायक प्रकार ; काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

| Updated on: Jan 12, 2022 | 11:49 AM

मुली व महिलांच्या फोटोसोबत छेडछाड करण्याबरोबरच ते फोटो ब्राझील, पाकिस्तान यासह अन्य देशातील ग्रुपवर व्हायरल केल्या. आरोपीच्या व्हॅट्सऍपच्या यादीमध्ये या देशातील व्हॉटस अप चे ग्रुप आढळून आले आहेत. या प्रकरणात त्यांचा आणखी कोण साथीदार आहे का या तपासही पोलीस करत आहेत.

Shocking  | 2019 पासून पुण्यात घडतोय बुली बाईचा धक्कादायक प्रकार ; काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर
पेगासस हेरगिरी प्रकरण : समितीचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर
Follow us on

पुणे – पुणे शहारात  बुली बाईचा (Bully bai )धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहारातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या महिला व मुलींचे फोटो काढून ते अश्लील रूपात तयार करून सोशला मीडियावर व्हायरल ( social Media)  केल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील खडकी परिसरातील ( khadaki area) वस्तीमध्ये हा प्रकार घडला आहे. वस्तीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने ही फिर्याद दिल्यानंतर या प्रकारला वाचा फुटली. खडकी पोलिसांनी(Police)  25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे .

2019 पासून बनवत  होता व्हिडीओ

या प्रकरणी अटक केलेला 25 वर्षीय तरुण वास्तव्यास असलेल्या परिसरातील महिला व अल्पवयीन मुलींचे फोटो, व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये काढत असे. त्यानंतर तेच फोटोचे व व्हडिओ अश्लील स्वरूपात रूपांतर करत व ते वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईटवरून व्हायरल करत असत. साधारण 2019पासून अश्या प्रकारे महिला व मुलींच्या व्हिडीओचे विद्रुपीकरण करत असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने त्याला 15जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

मोबाईल हँडसेटमध्ये मिळाली माहिती

खडकी पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईला जप्त करण्यात आला. पोलिसांनी मोबाईल तपासाला असता त्यामध्ये वस्तीतील महिला व मुलींचे अश्लील फोटो व व्हिडीओ तयार केल्याचे दिसून आले आहे. यांमध्ये 18 वर्षांखालील मुलींची नावे निष्पन्न झाली आहेत. अद्याप तपास तपास पूर्ण झालेला नसून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मोबाईल आढळून आलेल्या अनेक मुलींची ओळख पटली नसल्याची माहिती खडकी पोलिसांनी दिली आहे.

अन्य देशात फोटो पाठवले फोटो
आरोपीने मुली व महिलांच्या फोटोसोबत छेडछाड करण्याबरोबरच ते फोटो ब्राझील, पाकिस्तान यासह अन्य देशातील ग्रुपवर व्हायरल केल्याच्या समोर आले आहे. आरोपीच्या व्हॅट्सऍपच्या यादीमध्ये या देशातील व्हॉटस अप चे ग्रुप आढळून आले आहेत. या प्रकरणात त्यांचा आणखी कोण साथीदार आहे का या तपासही पोलीस करत आहेत. तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली.

अखेर…सिद्धार्थ दोन पाऊले मागे! सायना नेहवालवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्यांने मागितली माफी, वाचा काय होते संपूर्ण प्रकरण…

गोव्यात गेले अन् फुट पडली, राऊतांचा फडणवीसांवर पलटवार