काय सांगता, अडीच किलोचा एकच आंबा, मग या आंब्याला नाव तरी दिले काय?

| Updated on: May 18, 2023 | 10:30 AM

Mango Fruit : फळांचा राजा असलेला आंब्याचा हंगाम सध्या सुरु आहे. परंतु यंदा अवकाळी पावसाचा फटका आंब्याला बसला आहे. यामुळे हापूस आंबा महाग आहे. सध्या एका अडीच किलोच्या आंब्याची चर्चा सुरु आहे.

काय सांगता, अडीच किलोचा एकच आंबा, मग या आंब्याला नाव तरी दिले काय?
Mango
Follow us on

सोलापूर : यंदा हापूस आंबा भाव खातोय. अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे आंबा महाग आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात आणि पुणे बाजार समितीतही आंब्याची आवाक कमी झाली आहे. आंब्यांच्या या हंगामात अजून एका आंब्याची चर्चा सुरु झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील हा आंबा आहे. हा आंबा तब्बल अडीच किलोचा आहे. हा आंबा पाहण्यासाठी चांगलीच गर्दी झाली आहे. वेगवेगळे प्रयोग करुन शेतकऱ्याने हा आंबा विकसित केला आहे.

आंबा इतका मोठा की शहाळच

सोलापुरात तब्बल अडीच किलोचा आंबा विक्रीस आलाय. त्या आंब्याचं नामकरण चक्क ‘ शरद पवार ‘ असं करण्यात आले आहे. दूरवरून पाहिल्यानंतर एखादा मोठा शहाळच असल्याचा भास प्रत्येकाला होईल अशी या आंब्याची रचना आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दत्तात्रय घाडगे या प्रयोगशील शेतकऱ्यांना जुळे सोलापूर भागात आंबा महोत्सव भरवला आहे. या आंबा महोत्सवामध्ये अनेक जातीची आंबे विक्रीस ठेवण्यात आली आहेत. यामध्येच एक वेगळा प्रकारचा आंबा सध्या राज्यात चर्चेचा विषय बनलाय.

हे सुद्धा वाचा

Mango

काय आहे किंमत

आंब्याचा वजन तब्बल अडीच किलोपर्यंत आहे. देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्या कामाने मी भारावून गेलो आहे. पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत. यामुळेच मी या आंब्याचं नामकरण शरद पवार म्हणजेच शरद मँगो असं केल्याचं शेतकरीर दत्तात्रय घाडगे यांनी सांगितले. हा शरद आंबा सध्या सोलापुरात दोनशे रुपये प्रति किलोंनी विक्री केला जातोय. माढा सारख्या दुष्काळी भागात शेतकऱ्यांना हा प्रयोग केल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

कसा केला आंबा

अडीच किलोचा आंबा उत्पादन करण्यासाठी एकाच झाडावर कलम करून विविध प्रकारचे आंबे घेण्यात आले आहेत. होमिओपॅथीचे विविध औषधांचा वापरही करण्यात आलाय. दत्तात्रय घाडगे या प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या आठ एकर शेतजमिनीत जवळपास सात हजार केशर आंब्याची रोप लावली आहे. त्यात अडीच किलोचा आंबा आला आहे.