AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : जावयानं सासऱ्यावर चाकुनं केले सपासप वार; पुण्यातील खडकीतला प्रकार, स्वत:च पोलीस ठाण्यात झाला हजर

कौटुंबिक वादाच्या कारणातून जावयाने सासर्‍यावर चाकूने (Knife) वार करून त्यांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी सायंकाळी साडे सातच्या दरम्यान ही घटना उघड झाली.

Pune crime : जावयानं सासऱ्यावर चाकुनं केले सपासप वार; पुण्यातील खडकीतला प्रकार, स्वत:च पोलीस ठाण्यात झाला हजर
जावयाचे सासऱ्यावर चाकुनं सपासप वारImage Credit source: tv9
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Pradeep Garad | Updated on: Apr 21, 2022 | 10:38 AM
Share

पुणे : कौटुंबिक वादाच्या कारणातून जावयाने सासर्‍यावर चाकूने (Knife) वार करून त्यांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी सायंकाळी साडे सातच्या दरम्यान ही घटना उघड झाली. या घटनेनंतर जावयाने हातात चाकू घेऊन पोलीस (Police) ठाणे गाठत खडकी पोलिसांना स्वत:च खुनाची कबुली दिली आहे. रमेश रामचंद्र उत्तरकर (वय 65, रा. आकाशदीप सोसायटी, खडकी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अशोक गुलाब कुडले असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. उत्तरकर सायंकाळी साडे सात वाजता त्यांच्या कपड्याच्या दुकानात बसले होते. त्यावेळी कुडले याने तेथे येऊन त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यामध्ये उत्तरकर हे गंभीर जखमी झाले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू (Dead) झाला. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

2019पासून कुडले व त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडले हा उत्तरकर यांचा जावई आहे. 2019पासून कुडले व त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून वाद सुरू होते. तेव्हापासून पती-पत्नी वेगळे राहत आहेत. कुडले त्याच्या आईसोबत, तर त्याची पत्नी वडिलांकडे राहते. दोघांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत. तर उत्तरकर यांची दोन दुकाने असून त्यांनी दोन्ही दुकाने भाड्याने दिली आहेत. तर कुडले हा वडापावची गाडी चालवतो. दरम्यान, त्यांच्यातील कौटुंबिक वाद न्यायप्रविष्ठ आहे.

वादाचे पर्यवसान खुनात

कुडले हा उत्तरकर यांना पत्नीला नांदायला पाठवा, असे सातत्याने सांगत होता. तर उत्तरकर हे घटस्फोट घेण्याबाबत आग्रही होते. याच प्रकरणाबाबत बुधवारी न्यायालयात तारीख होती. न्यायालयात तारखेला हजर राहिल्यानंतर कुडले व उत्तरकर यांच्यात वाद झाले. त्या वादाचे पर्यवसान खुनात झाले आहे.

आणखी वाचा :

Pimpri Chinchwad crime : जिलेटिनच्या कांड्या लावून पिंपरी चिंचवडमध्ये उडवलं एटीएम, मात्र रोकड काही लुटता आली नाही; चोरटे पसार

Pune crime: 10 वर्षांच्या मुलीचा बलात्कार करणाऱ्या 10 वर्षांचा कारावास आणि 10 हजार रुपये दंड, 8 वर्षांनी निकाल

Pune Crime : लष्करातील निवृत्त कर्नलनं पत्नीवर गोळ्या झाडल्या, पत्नीची हत्या करुन स्वतःही जीव दिला

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?