AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुनील शेळकेंचा मोठा गौप्यस्फोट, थेट पवारांचं नाव घेत म्हणाले…

मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि शरद पवार यांच्यातील संघर्ष पाहयला मिळाला. सुनील शेळके यांनी पुरावे द्या नाहीतर पवारांनी खोटे आरोप केल्याचं सांगणार म्हटलं आहे. इतकंच नाहीतर यावेळी बोलताना शेळके यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.

शरद पवार यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुनील शेळकेंचा मोठा गौप्यस्फोट, थेट पवारांचं नाव घेत म्हणाले...
आमदार सुनीळ शेळके आणि शरद पवार यांचा फोटो
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 07, 2024 | 7:31 PM
Share

पुणे | आगामी निवडणुकांआधी शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाच्या लोणावळ्यामधील कार्यकर्त्यांचा मेळाव्यामध्ये याचीच प्रचिती दिसून आली. शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी पदाधिकाऱ्यांना धमकी दिल्याचं आरोपावर बोलताना पवारांनी शेळकेंना इशारा दिला होता. यावर पुरावे द्या त्यानंतर आरोप करा अशी प्रतिक्रिया सुनील शेळके यांनी दिली. त्यासोबतच शेळकेंनी सहा महिन्यांआधी ज्या घडामोडी झालेल्या तेव्हा दादांना व्हिलन करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं.

दादांना व्हिलन करण्याचा प्रयत्न करू नका- सुनील शेळके

गेल्या सहा महिन्यात ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा मीसुद्धा साक्षीदार आहे. आपण भारतीय जनता पक्षासोबत किंवा महायुतीसोबत जायचं तेव्हा तुम्हीदेखील होतात. मात्र ऐनवेळेला तुमची भूमिका बदलून तुम्ही दादांना व्हिलन करण्याचा जो काही प्रयत्न करत आहात तो करू नका. इतकंच माझा सांगण्याचा उद्देश असल्याचं सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ:-

शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहेत. शरद पवार यांनी वक्तव्य करताना शाहनिशा करायला हवी होती. नेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करायचा आहे. पण ही माहिती खोटी होती,  35 ते 40 कार्यकर्ते तिथे उपस्थितीत होते. एकतरी माणूस दाखवा की मी कोणाला धमकी दिली. तो माणूस समोर आणा. नाहीतर मी महाराष्ट्राला सांगणार की शरद पवारांनी माझ्यावर खोटे आरोप केले. अजित पवार यांना साथ देणं हे माझं वैयक्तिक मत होतं. शरद पवार यांनी माझ्यावर टीका करणं हे मला कधीच अपेक्षित नव्हतं, असं शेळके म्हणाले.

पवारांचा भरसभेतून शेळकेंना इशारा

मला असं समजलं की, तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येतायत म्हणून धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला? तुझ्या सभेला कोण आलं होतं? पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवं. मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नसल्याचा इशारा शरद पवार यांनी दिला होता.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल