AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुलाचे अपहरण झाले नाही तर तो विमानाने…’, मुलगा बेपत्ता प्रकरणी तानाजी सावंत काय म्हणाले?

शिवसेना नेते तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत पुणे विमातळावरुन बेपत्ता झाला आहे. परंतु त्याचे अपहरण झालेले नाही, असे स्वत: तानाजी सावंत यांनी माध्यमांना सांगितले. पुणे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत.

'मुलाचे अपहरण झाले नाही तर तो विमानाने...', मुलगा बेपत्ता प्रकरणी तानाजी सावंत काय म्हणाले?
| Updated on: Feb 11, 2025 | 7:25 AM
Share

माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत पुणे विमातळावरुन बेपत्ता झाला आहे. सोमवारी दुपारपासून तो नॉट रिचेबल झाला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या शोधासाठी वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाले नाही. तो न सांगता गेल्यामुळे आम्ही चिंताग्रस्त झाला आहोत, असे स्पष्ट केले. आता या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. ऋषीराज बँकॉककडे खासगी विमानाने निघाला होतो. आता रात्री ९ वाजेच्या सुमारास ऋषीराज सावंत पुणे विमानतळावर दाखल झाला आहे. ऋषीराज सावंत आणि त्यांचे दोन मित्र हे नेमकी कोणत्या कारणासाठी बाहेर चालले होते? याची माहिती आता आम्ही जाणून घेणार आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

काय म्हणाले तानाजी सावंत

शिवसेना नेते तानाजी सावंत म्हणाले की, माझा मुलगा ऋषीराज हा पुण्यावरुन विमानाने गेला आहे. त्याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतु तो बेपत्ता झालेला नाही किंवा त्याचे अपहरण झालेले नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आहेत. माझ्या घरातील पद्धत अशी की कोणी कुठेही गेले तरी एकमेकांना सांगून जाते.

ऋषीराज मला सांगितल्याशिवाय कुठे जात नाही. परंतु तो दुपारीपासून नाही. त्याने मला किंवा त्याच्या भावालाही काहीच सांगितले नाही. तसेच त्याने त्याची गाडी वापरली नाही. दुसऱ्याच्या गाडीने तो गेला आहे. त्याने फोनसुद्धा केला नाही. त्यामुळे तो पुणे विमानतळावर कसा गेला? हा प्रश्न आम्हा कुटुंबियांना पडला. मुलासाठी आम्ही चिंताग्रस्त झाल्यामुळे पोलिसांना कळवले आणि तपास सुरु झाला आहे.

मुलाबाबत गाडी चालकाने दिली माहिती

मुलगा विमानतळावर गेला, ही माहिती तुम्हाला कशी मिळाली त्यासंदर्भात बोलताना तानाजी सावंत म्हणाले, तो ज्या गाडीने विमानतळावर गेला, त्या गाडीच्या चालकाने आम्हाला ही माहिती दिली. चालकही घाबरलेला आहे. तो म्हणाला मी त्याला विमानतळावर सोडून आलो. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र होते. परंतु ते कोण होते, त्याची माहिती आम्हाला नाही. तसेच तो कुठे गेला त्याची माहिती नाही. तो ज्या विमानाने गेला ते विमान चार्टड आहे की नियमित विमान यासंदर्भात कोणती माहिती अजून नाही, असे तानाजी सावंत यांनी सांगितले.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.