Serum Institute Fire : सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला आग, मात्र कोव्हिशील्ड लस सुरक्षित

| Updated on: Jan 21, 2021 | 3:53 PM

सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग लागली आहे, पण त्याचा परिणाम कोव्हिशील्ड लसीवर होणार नाही.

Serum Institute Fire : सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला आग, मात्र कोव्हिशील्ड लस सुरक्षित
Follow us on

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. मांजरी परिसरातील गोपाळपट्टा भागात ही आग लागली आहे. मात्र, सुदैवानं कोव्हिशील्ड लस सुरुक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचं काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही. कोव्हिशील्ड लस बनवली जात असलेली जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला असलेल्या गेट आहे, तिथे ही आग लागली आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नसल्याची माहिती मिळत आहे.(The building of the Serum Institute caught fire, but did not affect vaccine production)

कोव्हिशील्ड या लसीच्या निर्मितीचं काम हे गेट नंबर 3, 4 आणि 5 या परिसरात बनवली जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मांजरी परिसरात सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीचं काम सुरु आहे. यात इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला ही आग लागली आहे. सुदैवाची बाब म्हणजे या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना लसीच्या पुरवठ्यावर परिणाम नाही

कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. दरम्यान लसीची निर्मिती ही सीरम इन्स्टिट्यूटच्या जुन्याच इमारतीत करण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती मिळत आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग मोठी आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 10 ते 15 गाड्या आग विझवण्याचं काम करत आहेत. या आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती नाही. तसंच सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड या लसीच्या निर्मिती आणि पुरवठ्यावर या आगीचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचं बापट म्हणालेत.

घातपाताची शक्यता- आ. मुक्ता टिळक

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग ही आघपात तर नाही ना, अशी शंका भाजपच्या आमदार मुक्ता टिकळ यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचं संकट अद्याप कायम आहे. त्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचा इमारतीलाच ही आग लागल्यानं हा घातपात तर नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केलीय.

संबंधित बातम्या :

Serum Institute Fire Live | कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग

Corona Vaccination : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ, राज्यात पहिल्या दिवशी 28,500 कोरोनायोद्ध्यांना लस

आजारी पडलेले कोरोना योद्धे रुग्णालयातून परतलेच नाहीत; मोदींना अश्रू अनावर

The building of the Serum Institute caught fire, but did not affect vaccine production