PMC Election | पुण्याच्या प्रभाग रचनेची उत्सुकता नेमकी कुणाला? पुणेकरांना? छे हो, बघा कुठून कुठून भेट देतायत वेबसाईटला

| Updated on: Feb 03, 2022 | 12:29 PM

परदेशांतूनही 200 जणांनी प्रभाग रचना पाहिल्याचे समोर आले आहे. त्यात, सर्वाधिक 156 वेळा अमेरिकेतून तर 28 वेळा इंग्लंडमधून प्रभाग रचना पाहण्यात आली आहे. तर सुमारे 25 हून अधिक जणांनी वेगवेगळ्या इतर देशांमधून प्रभाग रचना पाहिली. पुणे महानगरपालिकेच्या तंत्रज्ञान विभागाने ही माहिती दिली आहे.

PMC Election | पुण्याच्या प्रभाग रचनेची उत्सुकता नेमकी कुणाला? पुणेकरांना? छे हो, बघा कुठून कुठून भेट देतायत वेबसाईटला
PMC
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे- पुण्यातील आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी(Pune Municipal elections) प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा नुकताच प्रसिद्ध झाला. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा (ward structure) महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ पुणेकर नागरिकांनीच नाही तर परदेशातूनही अनेक नागरिकांनी उत्सूकता दाखवत संकेस्थळावरून आराखडा बघितल्याचे समोर आले आहे. संकेतस्थळावर आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभाग रचनेचे नकाशे इंग्लंड आणि अमेरिकेसह इतरही काही देशांत इंटरनेटवर पहिल्याचे समोर आले आहे. महापालिकेने मंगळवारी दुपारी प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध केला. त्यानंतर नंतर गेल्या दीड दिवसांत सुमारे 1 लाख 11 हजार जणांनी ही प्रभाग रचना महापालिकेच्या संकेतस्थळावर (Municipal website)पाहिली आहे.  तर सुमारे 24 हजार 705 जणांनी ही प्रभाग रचना डाऊनलोड केली आहे.

परदेशातील पुणेकरांना उत्सुकता 

पुण्यातून कामाच्या निमित्ताने ,शिक्षणासाठी परदेशात वास्तव्यास असलेल्या पुणेकर नागरिकांना या आराखडयामध्ये प्रचंड उत्सूकता असल्याचे दिसून आले. परदेशांतूनही 200 जणांनी प्रभाग रचना पाहिल्याचे समोर आले आहे. त्यात, सर्वाधिक 156 वेळा अमेरिकेतून तर 28 वेळा इंग्लंडमधून प्रभाग रचना पाहण्यात आली आहे. तर सुमारे 25 हून अधिक जणांनी वेगवेगळ्या इतर देशांमधून प्रभाग रचना पाहिली. पुणे महानगरपालिकेच्या तंत्रज्ञान विभागाने ही माहिती दिली आहे.

हरकती व सूचना मागवल्या

महानगरपालिकेने प्रभाग रचनेचा प्रारूप रचना आराखडे नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिध्द केला. त्यानंतर नागरिकांना या नकाशावर येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत आपल्या हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. महापालिकेच्या सावरकर भवन येथील निवडणुक कार्यालयात तसेच १५ क्षेत्रिय कार्यालयांमध्ये नागरिक आपल्या हरकती व सूचना दाखल करू शकणार आहेत. महापालिकेच्या विस्तारित इमारतीत तिसऱ्या मजल्यावर व सर्व क्षेत्रिय कार्यालयात त्या-त्या ठिकाणच्या प्रभागांचे नकाशे प्रसिध्द करण्यात आले आहेत. त्यानंतर 16 फेबु्रवारीला निवडणुक आयोगाकडे या हरकती व सूचना सादर करण्यात येईल व 26 फेब्रुवारीला या हरकती व सूचनांवर सुनवणी होणार आहेत. त्यानंतर बुधवार   2 मार्च रोजी शहरातील अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.

Ganesh Jayanti 2022 | माघी गणेश जयंतीला या 6 गोष्टी नक्की करा, जाणून घ्या या दिवशी गणपतीची पूजा करण्याची योग्य पद्धत

VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 10.30 AM | 3 February 2022

आई आणि मुलीच्या रंगलेल्या स्पर्धेत चिमुकलीला काय मिळतं गिफ्ट? धमाल उडवणारा Video Viral