निराधार महिलांना ‘स्वयंसिद्धा’चा आधार, पुण्यातला यशस्वी उपक्रम आता राज्यभर राबवणार!

कौटुंबिक वाद सुरू असलेल्या महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात (Family Court of Pune) 'स्वयंसिद्धा' (Swayamsiddha) उक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाला समाधानकारक यश मिळाल्यानं उपक्रमाचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निराधार महिलांना 'स्वयंसिद्धा'चा आधार, पुण्यातला यशस्वी उपक्रम आता राज्यभर राबवणार!
कौटुंबिक न्यायालय, पुणे
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 3:57 PM

पुणे : कौटुंबिक आधार नसलेल्या किंवा किंवा कौटुंबिक वाद सुरू असलेल्या महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात (Family Court of Pune) ‘स्वयंसिद्धा’ (Swayamsiddha) उक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाला समाधानकारक यश मिळाल्यानं उपक्रमाचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे निराधार असलेल्या किंवा कौटुंबिक वाद सुरू असलेल्या राज्यभरातील महिला आणखी सक्षम होण्यास मदत मिळणार आहे. (The Swayamsiddha initiative to be implemented in the Family Court of Pune will be implemented across the state)

महिलांना आर्थिक, मानसिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न

कौटुंबिक कलहामध्ये अडकलेल्या महिलांना त्यांचे आत्मभान जागृत करून, त्यांना आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न स्वयंसिद्धा प्रकल्पाच्या माध्यमातून केलं जातं. या महिलांमध्ये आलेले नैराश्य दूर करून, त्यांच्यात जगण्याची नवी उमेद निर्माण केली जाते. याच कामाचा विस्तार करण्यासाठी राज्यातील सर्व कौटुंबिक न्यायालयामधील समुपदेशकामार्फत हा प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मार्च 2017 मध्ये स्वयंसिद्धा उपक्रमाची सुरूवात

कौटुंबिक न्यायालयात प्रकरण सुनावणीला असताना अनेकदा महिलांन सासरच्या मंडळींकडून हवी तशी मदत मिळतेच असं नाही. अनेक माहेरची परिस्थिती बेताची असल्याने अनेक महिला माहेरी जाऊनही मदत घेऊ शकत नाही. त्यामुळे या महिलांची मोठी आर्थिक कोंडी झाल्याचं पहायला मिळतं. याकाळात महिलांना सक्षम बनवण्यासाठी पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात मार्च 2017 मध्ये स्वयंसिद्धा उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यातून आतापर्यंत 56 महिला प्रशिक्षित झाल्या आहेत तर 17 महिलांना नोकरीद्वारे रोजगार मिळाला आहे. विविध कौशल्य शिकत 15 महिलांनी घरगुती व्यवसाय सुरू केला आहे.

राज्यभर उपक्रम राबवण्यासाठी नियोजन

स्वयंसिद्धा उपक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि समुपदेशन झाल्यानंतर महिलांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून या महिला काही प्रमाणात आर्थिक सक्षम होत आहेत. त्यामुळे पुण्यात या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसू लागल्यावर राज्यभर हा उपक्रम राबवण्यासाठी नियोजन केलं जात आहे.

पुण्यात ‘रेप क्रायसिस सेंटर’ची स्थापना

मागच्या काही काळात राज्य आणि देशात महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. मात्र, बलात्कारासारखी गंभीर घटना घडल्यानंतर महिलांचं आयुष्य बदलून जातं. अनेक महिला स्वतःच अपराधीपणाची भावना घेऊन दबावात जगत राहतात. अशा महिलांच्या मनातली नकारात्मक भावना दूर करण्यासाठी, त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि कायदेविषयक मदत करण्यासाठी ‘सहयोग ट्रस्ट’तर्फे ‘रेप क्रायसिस सेंटर’ सुरू करण्यात आलं आहे.

बलात्कारासह जगणाऱ्यां महिलांना त्यांचे दुःख आणि समस्या सांगण्यासाठी एक सुरक्षित जागा म्हणून ‘सपोर्ट ग्रुप’ चालवण्यात येणार आहे. ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झालेले असतात अशा महिला जणू काही ती स्वतःचीच चूक आहे असा दबाव घेऊन आयुष्यभर जगत असतात. त्यामुळे त्यांच्या मनातला ताणतणाव एकमेकांसोबत संवादातून कमी करण्याचा प्रयत्न हा ‘सपोर्ट ग्रु’प करणार आहे.

इतर बातम्या :

19 वर्षीय तरुणीच्या सोनोग्राफीचा बहाणा, बीडमधील ‘नगराध्यक्ष’ डॉक्टरने अश्लील चाळे केल्याचा आरोप

पायल रोहतगी पुन्हा वादात अडकली, पुणे पोलिसांनी दाखल केला गुन्हा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

नग्न फोटो व्हायरल करेन, नागपुरातील तरुण हनीट्रॅपमध्ये अडकला, वडिलांच्या युक्तीने अशी झाली सुटका

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.