Pune crime | ते आले अन..कोयत्याने सपासप वार करत केली तरुणाची हत्या; पुण्यात कुठं घडला हा प्रकार?

त तरुण या रस्त्यावरील बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसलेला होता. त्याच दरम्यान तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच ते सहा जण तिथे आले. अन त्यांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने हल्ला चढवला . अचानक हल्ला झाल्याने तरुणाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारची संधी मिळालीच नाही.

Pune crime |  ते आले अन..कोयत्याने सपासप वार करत केली तरुणाची हत्या; पुण्यात कुठं घडला हा प्रकार?
सांगलीत चित्तथरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोरीला गेलेला ट्रॅक्टर
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 24, 2022 | 9:51 AM

पुणे – शहारत गुन्हेगारीचे (Crime) प्रमाणवाढण्याबरोबरच गंभीर गुन्हयाचे प्रकार वाढले आहेत. सिंहगड रस्त्यावरील(Sinhagad Road) नांदेड फाट्याजवळ एकाची कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मारुती लक्ष्मण ढेबे (वय 20, सध्या रा. वारजे, मूळ रा. धनगरवस्ती नांदेड ता. हवेली असे  हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी  (Police)वर्तवला आहे . पाच ते सहा जणांनी कोयत्याने सपासप वार केले.या घटनेमुळे परिसरातील नागरिक व व्यायसायिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. मृत तरुण यांच्यावर यापूर्वी कोणते गुन्हे नोंद आहेत का? याचे माहिती घेतली जात आहे.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सायंकाळच्या सुमारास नांदेड फाट्याजवळून नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. मृत तरुण या रस्त्यावरील बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसलेला होता. त्याच दरम्यान तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच ते सहा जण तिथे आले. अन त्यांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने हल्ला चढवला . अचानक हल्ला झाल्याने तरुणाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारची संधी मिळालीच नाही. कोयत्याने सपासप वर करण्यात आल्याने मारुती ढेबे जागीच कोसळला. या घटनेनंतर परिसरात मोठा गोधळ उडाला.

नागरिकांमध्ये दहशत

ही हत्या पूर्व वैमनस्यांतून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक व व्यायसायिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. मृत तरुण यांच्यावर यापूर्वी कोणते गुन्हे नोंद आहेत का? याचे माहिती घेतली जात आहे. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे, पोलीस हवालदार रामदास बाबर, निलेश राणे, पोलीस नाईक अशोक गिरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

Aurangabad | लाखो वारकऱ्यांच्या रुपात गोदाकाठी अवतरलं नवचैतन्य,  नाथषष्ठी उत्सावासाठी 4 लाखांहून अधिक भाविक

Sangli Murder | बारावीची परीक्षा द्यायला जेलबाहेर आला आणि रोहन नाईकचा खून केला!

Jalgaon Attack | मित्राच्या वरातीत नाचताना धक्का लागल्याचा राग, तरुणावर दोघांचा हल्ला