Jalgaon Attack | मित्राच्या वरातीत नाचताना धक्का लागल्याचा राग, तरुणावर दोघांचा हल्ला

Jalgaon Attack | मित्राच्या वरातीत नाचताना धक्का लागल्याचा राग, तरुणावर दोघांचा हल्ला
जळगावात तरुणावर हल्ला करणारे आरोपी
Image Credit source: टीव्ही9

वरातीत नाचत असताना सनी उर्फ बालकिसन जाधव याला तुषारचा धक्का लागल्याचा दावा केला जातो. या कारणावरुन दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर सनीने त्याच्या हातातील तीक्ष्ण हत्याराने तुषारवर वार केले.

संजय सरोदे

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 24, 2022 | 9:02 AM

जळगाव : लग्नाच्या वरातीत (Wedding) नाचताना धक्का लागल्यावरुन राडा झाला. यावेळी दोघा जणांनी तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार (Attack) केले. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. जळगावच्या रामेश्वर कॉलनीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मित्राच्या लग्नाच्या वरातीत नाचताना धक्का लागल्यावरुन वाद झाला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

तुषार ईश्वर सोनवणे हा तरुण आई-वडील व भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. रामेश्वर कॉलनीतील त्याचा मित्र चेतन लाडवंजारी याचे लग्न असल्याने तुषार सोनवणे हा मित्रांसोबत लग्नाच्या ठिकाणी नाचायला गेला होता.

वरातीत नाचताना धक्का

वरातीत नाचत असताना सनी उर्फ बालकिसन जाधव याला तुषारचा धक्का लागल्याचा दावा केला जातो. या कारणावरुन दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर सनीने त्याच्या हातातील तीक्ष्ण हत्याराने तुषारवर वार केले.

दोघा हल्लेखोरांना अटक

या प्रकरणी तुषार सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यावरून सनी उर्फ फौजी बालकिसन जाधव आणि सचिन उर्फ कोंडा कैलास चव्हाण अशा दोघांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी तात्काळ पोलिसांनी आरोपी सनी जाधव आणि सचिन चव्हाण यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांना 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

नातेवाईकांची बदनामी, बार मालकाचा माजी नगरसेवकावर खुनी हल्ला, दोघे गंभीर

डीजेवरचा ठेका जीवावर बेतला, यवतमाळमध्ये तरुणाची हत्या

मुंबईत पुरी भाजी विक्रेत्याचं ग्राहकाशी भांडण, लहान मुलीसह दोघांवर उकळतं तेल फेकलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें