Amit Thackeray : हे माझच घर, मी हाताने घेतो म्हणत आवडत्या भाज्या घेतल्या; शिरूर दौऱ्यात अमित ठाकरेंच्या साधेपणाने जिंकली नागरिकांची मने

या दौऱ्यात महविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यासोबत संवाद साधला. विद्यार्थिनी सोबत वैयक्तिक चर्चा करून राजकारणात विद्यार्थिनीची गरज असून तुम्ही प्रत्येकाने राजकारणात आले पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी असून सर्वांसाठी दार खुली केली आहेत. 

Amit Thackeray : हे माझच घर, मी हाताने घेतो म्हणत आवडत्या भाज्या घेतल्या; शिरूर दौऱ्यात अमित ठाकरेंच्या साधेपणाने  जिंकली नागरिकांची मने
Amit Thackery
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Aug 16, 2022 | 12:26 PM

पुणे- मनसे नेते व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे (MNS  Amit Thackeray) यांचा पुण्यातील शिरूर लोकसभा दौरा नुकताच पार पाडला. या दौऱ्यादरम्यान त्यांची भोजनाची व्यवस्था जिल्हाध्यक्ष यांच्या घरी करण्यात आली होती. मात्र जेवणासाठी उशिर झाल्याने अमित ठाकरे यांचा साधेपणा पुन्हा एकदा पहायला मिळाला. त्यांनी चक्क स्वयंपाक घरात जाऊन आवडीच्या भाज्या आपल्या हातानी घेत जेवणाचा बेत केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे सध्या मनसे विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी राज्यभर दौरा करत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर (Shirur)लोकसभा मतदार संघात त्यांनी एकदिवसीय दौरा केला. राजगुरूनगर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वात प्रथम विशेष विद्यार्थांन सोबत वैयक्तिक बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांना लागणारी मदत मिळून देण्याचं ही त्यांनी आश्वासन दिले.

विद्यार्थ्यांच्या सोबत साधला संवाद

अमित ठाकरे यांनी या दौऱ्यात महविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यासोबत संवाद साधला. विद्यार्थिनी सोबत वैयक्तिक चर्चा करून राजकारणात विद्यार्थिनीची गरज असून तुम्ही प्रत्येकाने राजकारणात आले पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी असून सर्वांसाठी दार खुली केली आहेत.  या संधीचा उपयोग विद्यार्थिनींनी केला पाहिजे असंही अमित ठाकरे म्हणाले.

दुपारची न्याहारी केली संध्याकाळी

वैयक्तिक प्रत्येक विद्यार्थिनी सोबत चर्चा करताना अमित ठाकरे दुपारच्या जेवणाची वेळ निघून घेली तरी बैठकीत मग्न होते. पुण्यात सकाळी आठ वाजता नाश्ता केलेले अमित ठाकरे ना जेवण करायला सायंकाळचे पाच वाजले. जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्या घरात जेवणाच्या पंगतीला बसलेले अमित ठाकरे यांना भुकेचे भान राहिलं नाही, त्यांनी चक्क स्वयंपाक घर गाठलं. हे माझच घर आहे , मी हाताने घेतो म्हणत आवडत्या भाज्या घेतल्या, काही लागला तर मी घेतो अस बोलत पंगतीत बसले. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. असून जेवणाची वेळ टळल्याने आणि जोराची भूक लागल्याने अमित ठाकरेंनी हातांनी घेवून दुपारची न्याहारी संध्याकाळी केली आणि मराठमोळ्या पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला .