
पुणे : दरवर्षी 31 डिसेंबरला ठिकठिकाणी दारु पार्टीचे आयोजन करण्यात येते. मग ते पब असो, बार असो, रेस्टॉरंट असो किंवा मित्रांच्या पार्ट्या असो, 31 डिसेंबरला जणू दारुचे पाट वाहतात, पुणेकर मात्र नेहमीच कायतरी हटके करत असतात, यंदाही 31 डिसेंबरला म्हणजे आज पुण्यात अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे लोकांना दारू न पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दारु नको दूध प्या
31 डिसेंबरनिमित्त दारू नको दूध प्या अशी हाक देण्यात आली आहे. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रोड परिसरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आनंदवन संस्थेकडून लोकांना या अनोख्या सेलिब्रेशनची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, सध्या तरूणाई व्यसनाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे, त्यामुळे त्यांना व्यसनाकडून सदृढतेकडे नेण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला नाही, फक्त तरुणाईच नाही तर सर्वच वयोगटातील लोकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
पुणे प्रशासनाची मार्गदर्शक नियमावली खालीलप्रमाणे
31 डिसेंबर व नवीन वर्षाचे स्वागत नागरिकांनी साधेपणाने आपल्या घरीच साजरे करावे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांच्या एकत्र जमान्यावर बंदी घालण्यात आली आहे. 31 डिसेंबर व नूतन वर्षाच्या निमित्ताने बंदिस्त हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केवळ 50 टक्केच लोक उपस्थित राहतील. तर खुल्या मैदानात कार्यक्रमांना केवळ 25 टक्के लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी मास्क व सॅनिट्झर वापर जरूर करावा. कोरोनाच्या पार्शवभूमीवर 60 वर्षाच्या वरील नागरिकांनी व लहान मुलानांनी सुरक्षेच्या व आरोग्याच्या दृष्टीकोनाटाऊन घराच्या बाहेर जाणे शक्यतो टाळावे. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी रस्त्यावर , बागेत, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये. तसेच सार्वजनिक ठिकाणी जात असताना सॅनिटायझर व मास्कचा वापर बंधनकारक आहे.