Trupti Desai : विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईनी केले आवाहन

| Updated on: Jun 14, 2022 | 1:57 PM

ज्या विधवा महिलांची इच्छा वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा करण्याची आहे त्यांनी पुढाकार घेऊन वटपौर्णिमा साजरी करावी, कारण हा सण महिलांचा आहे फक्त सुवासिनी म्हणून इतरांशी भेदभाव करणाऱ्यांचा नाही.

Trupti Desai : विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईनी केले आवाहन
Trupti Desai
Image Credit source: Tv9
Follow us on

पुणे – कोरोना महामारीनंतर यंदा प्रथमच मोठ्या उत्साहात राज्यात मोठ्या उत्साह वटपौर्णिमा(Vatpoornima) साजरी केली जात आहे. जन्मो जन्मी हाच पती मिळावा यासाठी सौग्यवती महिलांकडून(Woman) वडाची पूजा केली जात आहे.आजच्या दिवशी मोठ्या संख्येने महिला वडाच्या झाडाची पूजा करतात तर अनेक ठिकाणी महिला वडाच्या फांद्याची पूजा करून हा सण साजरा करतात. या वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या व भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी वडाच्या फांद्या तोडून पूजा करण्यापेक्षा वडाचे झाड ;लावून त्याची पूजा करण्याचा संकल्प करण्याचा संदेश दिला आहे. याबरोबरच ज्या विधवा महिलांची इच्छा वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा करण्याची आहे त्यांनी पुढाकार घेऊन वटपौर्णिमा साजरी करावी, कारण हा सण महिलांचा आहे फक्त सुवासिनी म्हणून इतरांशी भेदभाव करणाऱ्यांचा नाही असे मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलं आहे.

काय म्हणाल्या तृप्ती देसाई

वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलांनी वडाच्या झाडाच्या तोडलेल्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा एक वडाचे झाड लावून त्याचे कायम पालन पोषण करण्याचा वटपौर्णिमेदिवशी संकल्प करा. जशी आपल्याला सत्यवानाची सावित्री समजली तशी जोतिबाची सावित्रीही समजली आहे आणि म्हणूनच सत्यवानाच्या सावित्रीचा जयघोष फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी केला जातो आणि ज्योतिबाची सावित्री प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि म्हणूनच मुली शिकत आहेत, प्रगती करत आहेत, महिला उच्चपदी काम करत आहेत.ज्या विधवा महिलांची इच्छा वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा करण्याची आहे त्यांनी पुढाकार घेऊन वटपौर्णिमा साजरी करावी, कारण हा सण महिलांचा आहे फक्त सुवासिनी म्हणून इतरांशी भेदभाव करणाऱ्यांचा नाही. असे त्यांनी म्हटले आहे. याबाबतचा एकी व्हिडीओ प्रसिद्ध करत त्यांनी पाले मत व्यक्त केलं आहे.

समाज महिलांना रुढी परंपरांमध्ये जखडून ठेवतो – रुपाली चाकणकर

याबरोबरच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही वटपौर्णिमेच निमित्त साधत आपलं मत व्यक्त केलं आहे.  ‘वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेरे मारुन पुढचे सात जन्म हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करतात. पण मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या सासरच्या मंडळींनी देखील कधी आग्रह केला नाही वा माझ्या नवऱ्याने पण कधी हट्ट केला नाही. याबाबत मी भाग्यवान आहे. आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री फार लवकर समजली, पण ज्योतिबाची सावित्री अजून समजली नाही’, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. “आपला समाज महिलांना रुढी परंपरांमध्ये जखडून ठेऊन त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतो. वटपौर्णिमेचं उदाहारण घ्या. अनेक महिला वडाला फेरे मारतात. सात जन्म हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थना करतात. पण त्यातीलच काही महिला नवरा त्रास देतो म्हणून तक्रारही करत असतात. शेवटी समाज काय म्हणेल म्हणून त्यांना वडाची पूजा करावी लागते” असे परखड मत चाकणकरांनी व्यक्त केलं आहे.

हे सुद्धा वाचा