पुण्यात पीएमपी बसमध्ये युनिव्हर्सल पास बंधनकारक; पण तपासायला माणूस सापडेना

एका वाहकाला तिकीट देण्यासोबतच प्रवाशांकडे युनिव्हर्सल पास आहे की नाही याची तपासणी करणे अवघड आहे. त्यामुळे बसमध्ये पास तपासणीसाठी पीएमपीने नवीन मनुष्यबळासह शहरात ठिकठिकाणी अशी यंत्रणा उभारावी

पुण्यात पीएमपी बसमध्ये युनिव्हर्सल पास बंधनकारक; पण तपासायला माणूस सापडेना
pmp bus
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 8:00 AM

पुणे – शहरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोना नियमांची ऐशीतैशी होताना दिसून येत आहे. कोरोना निर्बंधानुसार शहरातील लोकल वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपी बसमध्ये युनिव्हर्सल पास बंधनकारक करण्यात आला आहे.मात्र,प्रवाश्यांकडे हा पास आहे का? किंवा त्यांच्याकडे कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र आहे का? याची तपासणीच होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नियम केवळ कागदावरच का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

तपासणीसाठी माणूसच नाही
रुग्ण संख्या वाढल्यानंतर पीएमपीमधील प्रवासी संख्या घटली आहे. मात्र तरीही नियमितपणे वाहतूक करणाऱ्यांकडेतरी युनिव्हर्सल पास आहे का? याची साधी चौकशीही केली जात नसल्याचे समोर आले आहे. अनेक स्थानकांवर बंधनकारक असलेला युनिव्हर्सलपासची वाहकांकडून तपासणी होत नाही. रुग्ण वाढीला ही गर्दी . कारणीभूत ठरल्यास जबाबदारी कोपणा घेणार असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

स्वतंत्र यंत्रणा हवी
शहारातील स्वारगेट हे वाहतुकीसाठीचे महत्त्वाचे ठिकाण आहे. परिसरात येणार्‍या बसला गर्दी असते. त्यातच थांब्यावर असलेले प्रवाशांच्या गर्दीचे लोट बसमध्ये शिरतात. त्यामुळे एका वाहकाला तिकीट देण्यासोबतच प्रवाशांकडे युनिव्हर्सल पास आहे की नाही याची तपासणी करणे अवघड आहे. त्यामुळे बसमध्ये पास तपासणीसाठी पीएमपीने नवीन मनुष्यबळासह शहरात ठिकठिकाणी अशी यंत्रणा उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. बसमध्ये युनिव्हर्सल पास तपासण्याच्या सूचना चालक-वाहकांना देण्यात आल्या आहेत. बसमध्ये वाहकांकडून युनिव्हर्सल पास तपासणी करण्यात येत आहे. जर वाहक करत नसतील, तर त्यांना पुन्हा एकदा कडक सूचना देण्यात येतील. अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली आहे.

रोहित-जुईलीचा साखरपुडा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल !

Navi Mumbai Crime : नेरुळमध्ये जन्मदात्यांकडून पोटच्या पोरांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

कोव्हिड 19  मधून रिकव्हर झालायेत?, आधी तुमचा ब्रश बदला; पुन्हा कोरोना संक्रमणापासून दूर रहा