Navi Mumbai Crime : नेरुळमध्ये जन्मदात्यांकडून पोटच्या पोरांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

आईची कसून चौकशी केली असता, पहिली मुलगी 90 हजार, दुसरी 2 लाख रुपयांना विकल्याचे तिने सांगितले. तर तिसरा मुलगा मात्र कुठे विकला याबाबत अजून काही समजले नाही. तर दोन मुलांचा शोध लागला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Navi Mumbai Crime : नेरुळमध्ये जन्मदात्यांकडून पोटच्या पोरांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड
नेरुळमध्ये जन्मदात्यांकडून पोटच्या पोरांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 5:46 PM

नवी मुंबई : पैशासाठी जन्मदात्यांकडून पोटच्या पोरांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील नेरुळमध्ये उघडकीस आला आहे. हा गंभीर प्रकार महिला बाल विकास विभाग ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या घटनेची माहिती मिळताच महिला बाल विकास विभाग आणि नवी मुंबई पोलिसांनी आरोपी आईला अटक केली. तर मुख्य आरोपी फरार झाला होता. मात्र पोलीस पथकाने त्याला सुद्धा ताब्यात घेतले आहे. आईची कसून चौकशी केली असता, पहिली मुलगी 90 हजार, दुसरी 2 लाख रुपयांना विकल्याचे तिने सांगितले. तर तिसरा मुलगा मात्र कुठे विकला याबाबत अजून काही समजले नाही. तर दोन मुलांचा शोध लागला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू असून त्याला शोधण्यासाठी पथक रवाना झाले असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. (Shocking case of sale of children by parents in Nerul revealed)

बाळ खरेदी व विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

या जोडप्याने 2029 मध्ये आपली 3 महिन्यांची मुलगी नवी मुंबईतील एनआरआय परिसरात विकल्याची माहिती तपासात दिली. त्यानुसार ही मुलगी खरेदी करणाऱ्या महिलेचे घर गाठले व ही मुलगी ताब्यात घेण्यात आली. हा व्यवहार 90 हजार रुपयांना झाल्याचे सापडलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. बाळाची खरेदी व विक्री करणाऱ्या दोघींविरोधात नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मुलीनंतरचा मुलगा आरोपीने कोठे विकला आहे यांच्या शोध सुरू आहे. नवी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या लोकांकडून अशा प्रकारे मुले जन्माला घालून त्यांची विक्री केली जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकार सुरु असल्याचे कळते. त्यामुळे महिला बाल विकास ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.

साताऱ्यातही अशाच प्रकारची घटना उघडकीस

साताऱ्यातही अशाच प्रकारचे घटना उघडकीस आली आहे. 15 हजार रुपयात दाम्पत्याने आपल्या बाळाची विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपी एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करीत असून हा सर्व प्रकार संशयास्पद असून सातारा पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. सध्या संबंधित दीड वर्षाच्या लहान मुलीला पोलिसांनी म्हसवड येथील शिशु बाल सुधार केंद्रात दाखल केले असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सांगितले. (Shocking case of sale of children by parents in Nerul revealed)

इतर बातम्या

Pune crime |धक्कादायक ! पुण्यातन गुंडांच्या टोळक्याकडून अल्पवयीन मुलावर गोळीबार

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये जुन्या वादातून तरुणावर गोळीबार, किरकोळ जखमी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.