Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये जुन्या वादातून तरुणावर गोळीबार, किरकोळ जखमी

परमेश्वर पातकळ याच्यावर चापडगावच्या बसस्थानक परिसरात भर चौकात हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी एक गोळी हवेत झाडली आणि एक गोळी पातकळ याच्यावर झाडली. ही गोळी पातकळ याच्या हाताला चाटून गेली. यात पातकळ किरकोळ जखमी झाला.

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये जुन्या वादातून तरुणावर गोळीबार, किरकोळ जखमी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 4:43 PM

अहमदनगर : जुन्या वादातून शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे एका तरुणावर गोळीबार(Firing)  झाल्याची घटना आज घडली आहे. या गोळीबारात सुदैवाने संबंधित तरुण किरकोळ जखमी झाला आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच शेवगाव पोलीस(Shevgaon Police) आणि जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखे (District Crime Branch)चे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून फरार आरोपीला पकडण्यासाठी पथक रवाना केले आहे. परमेश्वर उर्फ पप्पू पातकळ असे गोळीबार करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे तर अरविंद दराडे असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. (Firing on youth in an old dispute in Ahmednagar, Minor injuries in the attack)

हल्ल्यात पातकळ किरकोळ जखमी

परमेश्वर पातकळ याच्यावर चापडगावच्या बसस्थानक परिसरात भर चौकात हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी एक गोळी हवेत झाडली आणि एक गोळी पातकळ याच्यावर झाडली. ही गोळी पातकळ याच्या हाताला चाटून गेली. यात पातकळ किरकोळ जखमी झाला. शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि वाळू तस्करीचा धंदा चालतो. याच धंद्यात तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. यामुळे परमेश्वर पातकळ याच्यावर झालेला हल्ला हा वाळू तस्करीच्या वादातून झाला की कोणत्या जुन्या वादातून झाला याचा पोलीस तपास करीत आहेत.

उत्तर प्रदेशात न्यायालयाच्या आवारातच आरोपीवर गोळ्या झाडल्या

बलात्कार आणि अपहरणाचा आरोप असलेल्या आरोपीवर न्यायालयाच्या आवारातच पीडित मुलीच्या वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये घडली आहे. दिलशाद हुसैन असे आरोपीचे नाव आहे. दिलशाद हा मुझफ्फरपूर जिल्ह्यातील सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिभीपुरा येथे वास्तव्यास होता. 11 फेब्रुवारी 2020 रोजी दिलशादने याच परिसरात राहणाऱ्या माजी सैनिकाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी माजी सैनिकाने दिलेल्या तक्रारीवरुन दिलशाद विरोधात पोलिसांनी पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली होती. आरोपी मागील दोन वर्षापासून तुरुंगात होता. मात्र काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. शुक्रवारी याच केसची न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणीसाठी आरोपी आला असता पीडितेच्या वडिलांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी आरोपीच्या डोक्यात घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी माजी सैनिकाला अटक केली आहे. (Firing on youth in an old dispute in Ahmednagar, Minor injuries in the attack)

इतर बातम्या

Hingoli Crime : हिंगोलीत पती-पत्नीच्या नात्याला काळिमा, नवऱ्यानेच घडवून आणला बायकोवर बलात्कार

Crime | नवऱ्यासह सासरच्या मंडळींकडून सतत त्रास; 20 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप
'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप.
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा.
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.