AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hingoli Crime : हिंगोलीत पती-पत्नीच्या नात्याला काळिमा, नवऱ्यानेच घडवून आणला बायकोवर बलात्कार

आरोपीच्या पत्नी व मुलीला त्याने चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत पत्नीवर बलात्कार केला. यानंतर पीडितेने हिंगोली ग्रामीण पोलिसांकडे धाव घेत घटनेची माहिती दिली. तसेच पतीही आता चारित्र्यावर संशय घेत असल्याचे सांगत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

Hingoli Crime : हिंगोलीत पती-पत्नीच्या नात्याला काळिमा, नवऱ्यानेच घडवून आणला बायकोवर बलात्कार
लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 3:43 PM
Share

हिंगोली : पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना हिंगोलीत उघडकीस आली आहे. तालुक्यातील एका गावात पतीनेच स्वतःच्या पत्नीवर मित्राकडून बलात्कार(Rape) घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीनुसार हिंगोली ग्रामीण पोलिसा(Hingoli Rural Police)त पतीच्या मित्राविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पतीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. (Hingoli woman raped by husband’s friend, Case registered in rural police)

आरोपी आपल्या पत्नी व मुलीसह हिंगोली तालुक्यातील एका गावात राहतो. आरोपी 20 जानेवारीच्या रात्री घरातून निघून गेला आणि मित्राला घरी पाठवले. घरात पत्नी आणि मुलगी एकटीच असल्याचे सांगून पत्नीवर बलात्कार करण्यासाठी मित्राला घरी पाठवले. त्यानुसार आरोपीचा मित्र घरात घुसला. आरोपीच्या पत्नी व मुलीला त्याने चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत मित्राने पत्नीवर बलात्कार केला. यानंतर पीडितेने हिंगोली ग्रामीण पोलिसांकडे धाव घेत घटनेची माहिती दिली. तसेच पतीही आता चारित्र्यावर संशय घेत असल्याचे सांगत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

अकोल्यात पोलीस कोठडीत आरोपीवर अनैसर्गिक अत्याचार

चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीवर पोलीस कोठडीत पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 9 जानेवारी रोजी रात्री चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी शेगावमधून एका सराफाला अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. व्यापाऱ्याला शेगावहून गाडीतून अकोल्याला आणताना पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलीस कोठडीतही मारहाण करीत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. यामुळे मानसिक धक्का बसलेल्या व्यापाऱ्याने सुटका होऊन घरी आल्यानंतर कुटुंबियांना आपबिती सांगितली. याबाबत व्यापाऱ्याने अकोला पोलीस अधिक्षक आणि सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नसून शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे चौकशी सोपवण्यात आली आहे. (Hingoli woman raped by husband’s friend, Case registered in rural police)

इतर बातम्या

Crime | नवऱ्यासह सासरच्या मंडळींकडून सतत त्रास; 20 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Gorakhpur Murder | न्यायालयाच्या आवारातच आरोपीची हत्या, बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांनी झाडल्या गोळ्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.