Crime | नवऱ्यासह सासरच्या मंडळींकडून सतत त्रास; 20 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Crime | नवऱ्यासह सासरच्या मंडळींकडून सतत त्रास; 20 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
सांकेतिक फोटो

नवरा तसेच सासरच्या मंडळींकडून दिल्या जाणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका 20 वर्षीय महिलेने आत्महत्या (Women Suicide) केली. गळफास लावून या महिलेने स्वत:ला संपवलं. लग्नात हुंडा न दिल्यामुळे तसेच वेगवेगळे कारण दाखवून या महिलेला सासरच्या मंडळींकडून शारिरीक आणि मानसिक छळ केला जायचा, असा आरोप केला जातोय.

गणेश सोळंकी

| Edited By: prajwal dhage

Jan 22, 2022 | 2:30 PM

बुलडाणा : सासरच्या मंडळींकडून दिल्या जाणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका 20 वर्षीय महिलेने आत्महत्या (Women Suicide) केली. गळफास लावून या महिलेने स्वत:ला संपवलं. लग्नात हुंडा न दिल्यामुळे तसेच वेगवेगळे कारण दाखवून या महिलेचा सासरच्या मंडळींकडून शारिरीक आणि मानसिक छळ केला जायचा, असा आरोप केला जातोय. महिलेच्या (Women) मृत्यूनंतर जलंब पोलीस (Police) ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कठोरा येथे ही घटना घडली.

हुंडा मिळाला नाही म्हणून शारीरिक, मानसिक छळ केला जायचा

मिळालेल्या माहितीनुसार शेगाव तालुक्यातील कठोरा येथे 20 जानेवारी रोजी धक्कादायक घटना समोर आली. येथे महिलेने गळफास घेत स्वत:ला संपवलं. तुला स्वयंपाकच येत नाही, जेवण जास्त करते, असे मृत महिलेला सतत हिणवले जायचे. तसेच हुंडा मिळाला नाही म्हणून शारीरिक, मानसिक छळ केला जायचा. हा त्रास असह्य झाल्याने 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेण्यापूर्वी या विवाहितेने आपल्या नातेवाईकाला व्हिडीओ कॉल करून सर्व घटना ऐकवली आणि गळफासाचे फोटो काढून आत्महत्या केली. या प्रकरणी पती, सासू, सासरा, दीराला जलंब पोलिसांनी गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.

सासरच्या मंडळींना बेड्या

दरम्यान, मृत महिलेचे वडील देविदास राजुस्कर राहणार दसरानगर, शेगाव यांनी या प्रकरणात तक्रार दिली असून पोलिसांनी पती पवन सुभाष वाघ, सासरा सुभाष वाघ, सासू महानंदा वाघ, दीर गणेश यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलंय. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

इतर बातम्या :

Akola Crime | धक्कादायक ! पाेलीस कोठडीत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, सराफा व्यापाऱ्याचा पोलिसांवरच गंभीर आरोप

Gorakhpur Murder | न्यायालयाच्या आवारातच आरोपीची हत्या, बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांनी झाडल्या गोळ्या

Pimpri Chinchwad crime | हत्येप्रकरणी गुंड अभिजित नलावडेसह साथीदारांच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनीआवळलया मुसक्या


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें