Pimpri Chinchwad crime | हत्येप्रकरणी गुंड अभिजित नलावडेसह साथीदारांच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनीआवळलया मुसक्या

Pimpri Chinchwad crime | हत्येप्रकरणी गुंड अभिजित नलावडेसह साथीदारांच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनीआवळलया मुसक्या
प्रातिनिधीक फोटो

मौजमजेसाठी पैसे मिळवण्यास आरोपी अभिजित नलावडे व त्याचे साथीदार नागरिकांची लूट करत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंटूकुमार सहा यांची लूट करण्याच्या उद्देशाने हत्या करण्यात आली.

रणजीत जाधव

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 22, 2022 | 11:43 AM

पिंपरी- वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सक्रिय झाले आहेत. भोसरीमध्ये मौजमजेसाठी लूटमार करून एका व्यक्तीची हत्या करणाऱ्या ए एन टोळीचा म्होरक्या अभिजित नलावडे याच्यासह त्याच्या साथीदाराला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यांनी 17 तारखेला रात्री पिंटूकुमार सहा याची डोक्यात दगड घालून हत्या करून लूट केली होती.

असा झाला उलगडा

मौजमजेसाठी पैसे मिळवण्यास आरोपी अभिजित नलावडे व त्याचे साथीदार नागरिकांची लूट करत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंटूकुमार सहा यांची लूट करण्याच्या उद्देशाने हत्या करण्यात आली. आरोपीनी हत्या करत असलेली सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. या सीसीटीव्हीहीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास करत टोळीला जेरबंद करत आरोपींना अटक केली.

बेकायदा गावठी पिस्तुल जप्त

दुसरीकडं पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्यापोलिस कर्मचाऱ्यांनी बेकायदा गावठी पिस्तुल जप्त केले आहे. वडगांव मावळ येथे पेट्रिलिंग करताना गावठी पिस्तूल विक्रीला घेऊन येणार असल्याची ,माहिती पोलिसाना मिळाली.त्या माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली. पोलिसांनी अनिल राघू शिंदे,आणि धर्मेश रवींद्रकुमार जयस्वाल यांना अटक केली आहे. कारवाई दरम्यान दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे अशी एक लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलं आहे.

Beed Crime | बीडमध्ये भाजप नेत्याच्या शिपायाला लुटले, जीवे मारण्याची धमकी; चोरट्यांचा शोध सुरु

कीर्ती शिलेदार याच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचं मोठं नुकसान, अजित पवारांकडून श्रद्धांजली

तुरुंगात राहून आपल्याच शुक्राणूतून चार मुलं जन्मली! पॅलेस्टिनी दहशतवाद्याचा दावा, कशी? पाहा हा Video

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें