तुरुंगात राहून आपल्याच शुक्राणूतून चार मुलं जन्मली! पॅलेस्टिनी दहशतवाद्याचा दावा, कशी? पाहा हा Video

तुरुंगात राहून आपल्याच शुक्राणूतून चार मुलं जन्मली! पॅलेस्टिनी दहशतवाद्याचा दावा, कशी? पाहा हा Video
रफत अल-करावी (सौ. पीएमडब्ल्यू)

पॅलेस्टाइन(Palestine)च्या एका दहशतवाद्या(Terrorist)नं अजबच दावा केलाय. आपण तुरुंगात असताना आपल्याच शुक्राणू(Sperm, Semen)तून चार मुलं जन्माला आली. आता या दहशतवाद्याच्या या अजब दाव्यावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रदीप गरड

|

Jan 22, 2022 | 11:26 AM

पॅलेस्टाइन(Palestine)च्या एका दहशतवाद्या(Terrorist)नं अजबच दावा केलाय. आपण तुरुंगात असताना आपल्याच शुक्राणू(Sperm, Semen)तून चार मुलं जन्माला आली. त्याचा दावा आहे, की तस्करी केल्यानंतर त्याचं स्पर्म बाहेर जायचं. आता या दहशतवाद्याच्या या अजब दाव्यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तुरुंगातून सुटल्यानंतर एका मुलाखतीत या दहशतवाद्यानं हा दावा केलाय. पीएमडब्लूच्या चॅनेलवर ही मुलाखत उपलब्ध आहेत. यात त्यानं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. हे ऐकून आपल्यालाही धक्का बसेल. पोलिसांच्या डोळ्यात कशी धूळफेक केली, हे ही तो सांगतोय.

पॅलेस्टिनी दहशतवादी

‘डेली स्टार’नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी रफत अल-करावीनं हा धक्कादायक दावा केला आहे. हा दहशतवादी गेली 15 वर्षे तुरुंगात होता. त्यानं पाकिटामधून शुक्राणू बाहेर पाठवल्याचं सांगितलं. रफतनं दावा केला, ‘आम्ही कॅन्टीनच्या मार्गे एका पिशवीत शुक्राणू बाहेर पाठवत असू. या पिशवीत शुक्राणू असायचे जसं एखादं सुपरमार्केट खरेदीसाठी आपण करतो तसंच.

2006मध्ये करण्यात आली होती अटक

पीएमडब्ल्यू (पॅलेस्टिनियन मीडिया वॉच)च्या अहवालानुसार, अशाप्रकारे 101 मुलांचा जन्म झाला आहे. रफत अल-करावी हा अल-अक्सा शहीद ब्रिगेडचा सदस्य आहे. इस्रायलविरुद्धच्या दहशतवादी कारवायांसाठी त्याला 2006मध्ये अटक करण्यात आली होती. मार्च 2021मध्ये त्याची सुटका झाली. नुकतीच त्यानं एक मुलाखत दिली. तिथं तो मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा तो गौरव करत होता.

कशी होते शुक्राणूंची तस्करी?

पीएमडब्ल्यू(Palestinian Media Watch)ला दिलेल्या मुलाखतीच्या या व्हिडिओमध्ये सबटायटल्स आहेत. ते इंग्रजीत आहेत. रफत अल-करावी म्हणाला, ‘आम्ही व्यावसायिक पद्धतीनं चिप्स किंवा बिस्किटांच्या पिशवीत शुक्राणू/वीर्याचे नमुने टाकायचो. जे इस्रायली पोलीस अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं. ही बॅग घ्यायला आई किंवा बायको यायची. यानंतर बॅग रझान मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आली. जिथं दात्याचे शुक्राणू डॉक्टरांनी महिलेला दिले.

Live रिपोर्टिंग सुरू असताना अचानक महिला पत्रकाराला मागून दिली धडक, पाहा पुढे काय झालं…

Video : लॉकडाऊन असायला हवा की नको? मुलानं दिलं मजेशीर उत्तर, तुम्हालाही हसू येईल

घाट पार करण्यासाठी ट्रॅक्टरचालकाचा जीवघेणा प्रवास, बीड जिल्ह्यातला Video होतोय Viral

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें