AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : लॉकडाऊन असायला हवा की नको? मुलानं दिलं मजेशीर उत्तर, तुम्हालाही हसू येईल

कोरोना(Corona)नं धडकी भरवली आहे. नवीन व्हेरिएंटबद्दल लोकांमध्ये भीती आहे. ओमिक्रॉन(Omicron)च्या केसेसमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. सोशल मीडियावर पोस्टही पाहायला मिळत आहेत. आता मुलांचा मजेदार व्हिडिओही व्हायरल (Viral) होत आहे.

Video : लॉकडाऊन असायला हवा की नको? मुलानं दिलं मजेशीर उत्तर, तुम्हालाही हसू येईल
लॉकडाऊनबाबत मुलाचं मजेशीर उत्तर
| Updated on: Jan 22, 2022 | 10:56 AM
Share

सर्वत्र पुन्हा एकदा कोरोना(Corona)नं धडकी भरवली आहे. नवीन व्हेरिएंटबद्दल लोकांमध्ये भीती आहे. ओमिक्रॉन(Omicron)च्या केसेसमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. व्हायरस टाळण्यासाठी अनेक ठिकाणी निर्बंध वाढवण्यात आले आहेत. मात्र, काही ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण भारतात लॉकडाऊनबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आणि सरकार लॉकडाऊनच्या बाजूनं नाही. सध्या सोशल मीडियावर कोरोना आणि लॉकडाऊनबाबत अनेक पोस्ट पाहायला मिळत आहेत. आता मुलांचा मजेदार व्हिडिओही व्हायरल (Viral) होत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

आवरणार नाही हसू

यूझर्स एक एक मजेदार मीम्स, व्हिडिओ आणि जोक्स शेअर करत राहतात. आता या एपिसोडमधील एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू थांबवता येवू शकणार नाही. क्वचितच कोणी नाकारेल, की जेव्हा देशात पहिल्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला तेव्हा सोशल मीडियावर बरेच मजेदार व्हिडिओ शेअर करण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांचे व्हिडिओही आपण पाहिले होते.

काय उत्तर देतो विद्यार्थी?

आता काही विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, यांचं उत्तर ऐकून तुमचंही डोकं विचार करायला लागेल. व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी बसलेले दिसत आहेत. मग एक विद्यार्थी, अँकरिंग करत, दुसर्‍या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतो आणि विचारतो, की लॉकडाऊन लागू केला जावा की नाही, तुम्हाला काय वाटतं? यावर विद्यार्थी म्हणतो, की लॉकडाऊन असायलाच हवा. मला फ्री फायरची लेव्हल पूर्ण करायची आहे. तसंच आम्हाला जनरल प्रमोशनची आवश्यकता आहे. त्याचवेळी आणखी एका विद्यार्थ्यानं माझंही असंच मत असल्याचं सांगितलं. मलाही जनरल प्रमोशन हवं आहे, कारण मला लिहिणं-वाचणं आवडत नाही.

View this post on Instagram

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ सर्वांनाच खूप आवडलाय. लोक कमेंट्स आणि लाइक्स करत आहेत. आम्हाला खात्री आहे, की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक हसतील. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही ‘bhutni_ke_memes‘ नावाच्या पेजवर व्हिडिओ पाहू शकता.

Live रिपोर्टिंग सुरू असताना अचानक महिला पत्रकाराला मागून दिली धडक, पाहा पुढे काय झालं…

Video : जंगल सफारीवेळी गाडीत घुसला सिंह, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा!

नाद करा पण आमचा कुठं! Mahindra Thar ची चक्क शोरुममध्येच टेस्ट ड्राईव्ह, अखेर मदतीसाठी JCB मागवला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.