MNS Vasant More : पुणे अध्यक्षपदावरून हाकलल्यानंतरही वसंत मोरे मनसेत राहण्यावर ठाम, मोरेंची पहिली प्रतिक्रिया

पुण्यात मनसेची मदार संभाळणारा मनसेचा धाकड नेताच या भूमिकेने नाराज झाल्याने मनसेत मोठा पेच निर्माण झाला होता. पुणे मनसे अध्यक्षपदावरून वसंत मोरे यांना अखेर हाटवण्यात आले आहे. त्यांच्या ठिकाणी पुणे मनसेच्या अध्यक्षपदी साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यानंतरही मी मनसेत राहण्यावर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.

MNS Vasant More : पुणे अध्यक्षपदावरून हाकलल्यानंतरही वसंत मोरे मनसेत राहण्यावर ठाम, मोरेंची पहिली प्रतिक्रिया
वसंत मोरे अद्याप तरी मनसेत राहण्यावर ठाम
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 07, 2022 | 3:02 PM

पुणे : शनिवारी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशीदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतल्याने मनसेत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. या भूमिकेबाबत काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला कळेना म्हणत पुण्याचे मनसे अध्यक्ष वसंत मोरे (Mns Vasant More) हे नाराज होते. पुण्यात मनसेची मदार संभाळणारा मनसेचा धाकड नेताच या भूमिकेने नाराज झाल्याने मनसेत मोठा पेच निर्माण झाला होता. पुणे मनसे अध्यक्षपदावरून वसंत मोरे यांना अखेर हाटवण्यात आले आहे. त्यांच्या ठिकाणी पुणे मनसेच्या अध्यक्षपदी साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यानंतरही मी मनसेत राहण्यावर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे, इतक्यात तरी मनसे सोडायची इच्छा नाही, त्यामुळे साईनाथ बाबर माझाच कार्यकर्ता आहे, तो अध्यक्ष झाला तरी मला काही अडचण नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.

वसंत मोरे काय म्हणाले?

गेल्या दोन तीन दिवसांपासून खूप लोक मला मनसे सोडण्यासाठी संपर्क करत आहेत. मात्र मी सर्वांना आत्ताच मनसे सोडण्याचा विचार नाही, असे सांगत आहे. ज्या दिवशी माझ्या मनात अस विचार येईल त्या दिवशी मी उघडपणे सांगेल, असेच मी सर्वपक्षीय लोकांना सांगत आहे, असेही वसंत मोरे म्हणाले आहे. गेली सत्तावीस वर्षे मी राज ठाकरेंसोबत आहे. त्यामुळे पुढेही त्यांच्या सोबत राहीन. माझं साहेबांशी काही बोलणं झालं नाही, मात्र माझं पुण्याचं अध्यक्षपद गेलंंय. मात्र अजूनही माझं मनसे सैनिक पद गेलेलं नाही. मला अविनाश जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत, असेही ते म्हणाले. मी थोडासा सेंटिमेंटल आहे, हे राज ठाकरे साहेबांनाही माहिती आहे, तसेच मला इतर पक्षात येण्यासाठी आता फक्त पंतप्रधानांचाच फोन यायचा बाकी आहे, अशी खोचक प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी पुणे मनसेचे अध्यक्षपद गेल्यानंतर दिली आहे.

महापालिकेत मनसेला फटका बसणार?

वसंत मोरे यांना पुणे मनसेच्या अध्यक्षपदावरून हाकलल्यानंतर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आधी रुपाली पाटलांचा मनसेला रामराम आणि आता वसंत मोरेंची नाराजी, आणि त्यानंतर अध्यक्षपदावरून हाकलपट्टी, त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडवर मनसेची डोकेदुखी वाढू शकते. याचा फटका मनसेला पुणे महापालिकेच्या निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे.  तसेच वसंत मोरे यांनी काही वेगळा निर्णय घेत इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेतला तर मनसेपुढचा पेच आणखी वाढू शकतो.

Vasant More | मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन वसंत मोरेंना हटवले, भोंगा प्रकरणानंतर राज ठाकरेंचा मोठा निर्णय

Video Chhagan Bhujbal on ED | ईडी हा राक्षसी कायदा, अकोल्यात छगन भुजबळ यांनी व्यक्त केली चिंता

MNS: भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसेचे मुस्लिम नगरसेवकही अडचणीत, तुम्ही मुस्लिम असूच शकत नाही; संभाषण जसंच्या तसं