CCTV Video: पुण्यात पोलीसांच्या नाकावर टिच्चून गुंडागर्दी, वाहनांची पुन्हा तोडफोड, सीसीटीव्हीत घटना कैद

| Updated on: Mar 12, 2022 | 10:46 AM

गुंडांनी वाहनावर दगड, पालघनसारख्या हत्याराने काचा फोडल्या आहेत. एवढंच नव्हे गल्ली बोळातील वाहनावर तसेच नागरिकांच्या घराबाहेर पाण्याचे ठेवण्यात आलेलं ड्रमही फोडण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

CCTV Video: पुण्यात पोलीसांच्या नाकावर टिच्चून गुंडागर्दी, वाहनांची पुन्हा तोडफोड, सीसीटीव्हीत घटना कैद
येरवड्यात वाहनांच्या तोडफोडीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे- शहारातील गुन्हेगारीचे (Crime) प्रमाण वाढत दुसरीकडं गावगुंडाचा हौदास वाढताना दिसत आहे. येरावडा परिसरातील(yerawada  area) वाहनतळ येथे वाहनांची तोडफोड केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे.स्थानिक नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी गुंडांनी हे कृत्य केले आहे. या घटनेत एक चारचाकी वाहन, 5 रिक्षा, 5 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. गुंडांनी वाहनावर दगड, पालघनसारख्या हत्याराने काचा फोडल्या आहेत. एवढंच नव्हे गल्ली बोळातील वाहनावर तसेच नागरिकांच्या घराबाहेर पाण्याचे ठेवण्यात आलेलं ड्रमही फोडण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीत घटना कैद झाकी आहे.  या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या(Pune Police )  कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

यापूर्वी धानोरी परिसरात स्थानिक गुंडांकडून धारदार सत्रांचा धाक दाखवत व्यापारी व रहिवाशांना धमकावण्यासह खंडणी मागणे, महिला व मुलींची छेडछाड कराण्यांचे प्रकार सातत्याने सुरु असल्याचे समोर आले आहे. पोलीस प्रशासनासह , स्थानिक प्रतिनिधींकडूनही याकडं दुर्लक्ष केलं जात आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे, दारू पिऊन धिंगाणा करणे, दुचाकींचे आवाज काढण्याचा प्रकार घडला होता

गावगुंडावर कारवाई आवश्यक

या घटनांमुळे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना नेमकं कोण मदत करते? कोणाच्या जीवावर ते दादागिरी करतात? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे. या गंभीर प्रकरणी स्थानिक नगरसेवक, आमदार अथवा कोणतेही लोकप्रतिनिधी यांच्याकडून दाद मिळत नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या दहशतीमुळे तक्रार देण्यासही कोणी धजावत नाही. भविष्यात या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे .

RBI Alert : केंद्रीय बँकेच्या नावाने पैसे उकळणारी टोळी सक्रिय, ऑनलाईन फसवणुकीपासून कसे सावध राहाल?

Agricultural Pump : वाढीव वीजबिलावर रामबाण उपाय, पडताळणी अन् जागेवर निपटारा

Women’s World Cup | विश्वचषकात टीम इंडियाची धमाल, स्मृतीनंतर हरमनप्रीत कौरची सेंच्युरी