Pune Kidnapping Case Balewadi | काळजाचा तुकडा अखेर सापडला! बेपत्ता स्वर्णव चव्हाण अखेर सुरक्षित परतला

| Updated on: Jan 19, 2022 | 6:30 PM

स्वर्णव उर्फ डुगु असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव होते. दहा दिवसांपूर्वी त्याचे अपहरण झाले होते.

Pune Kidnapping Case Balewadi | काळजाचा तुकडा अखेर सापडला! बेपत्ता स्वर्णव चव्हाण अखेर सुरक्षित परतला
पुण्यातून चिमुरड्याचे अपहरण
Follow us on

पुणे : बालेवाडी परिसरातून अपहरण झालेल्या चार वर्षाच्या मुलाचा शोध लागलाय. दहा दिवसानंतर पुनावळे येथे तो सापडला असून अपहरणकर्ते पळून गेले असल्याची माहिती समोर आली आहे. स्वर्णव उर्फ डुगु असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव होते. दहा दिवसांपूर्वी त्याचे अपहरण झाले होते. त्याच्या शोधासाठी सोशल मीडियावर अनेकांनी आवाहन केलं होतं. अखेर हा मुलगा सुखरुप घरी परतला आहे. पुण्यातील बालेवाडी (Balewadi) हायस्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून स्वर्णव चव्हाण (Swarnav Chavan) उर्फ डुग्गू या चार वर्षांच्या चिमुरड्याचं अपहरण झाल्याचा संशय होतं. तसं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं होतं. गेल्या दहा दिवसांपासून त्याचा शोध सुरु होते. दरम्यान, स्वर्णवचे वडील सतीश चव्हाण सोशल मीडियावरुन अपहरणकर्त्यांना वारंवार आवाहन करताना दिसले होते. हवे तितके पैसे घ्या, मात्र माझ्या लेकराला सोडा, अशी आर्त विनवणी सतीश चव्हाण केली होती.

अखेर स्वर्णव घरी परतला

याशिवाय, स्वर्णवला ताप आला असल्यास, त्याला कोणतं कफ सिरप द्यावं, याबद्दलही सतीश चव्हाणांनी माहिती दिली होती. त्याच प्रमाणे चार वर्षांच्या लहान मुलासाठी औषध विकत घ्यायला येणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवा, असं आवाहनही चव्हाणांनी फार्मसी स्टोअर चालकांना केलं होते. सतीश चव्हाणांची अगतिकता पाहून नेटिझन्सही हळवे झाले होते. अखेर स्वर्णव घरी सुखरुप परतल्यामुळे त्याच्या पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.

गेल्या दहा दिवसांपासून सुरु होता स्वर्णवचा शोध

भाजप आमदारांनीही शेअर केला होता फोटो

भाजप आमदार महेश लांगडे यांनी एक फोटो जारी केला होता. त्यामध्ये अपहरण झालेल्या स्वर्णवचा फोटो दाखवत त्याला शोध घेण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळणाऱ्या दुचाकीचे दोन फोटो शेअर करण्यात आले होते. स्वर्णव चव्हाण या मुलाचं काळ्या रंगाच्या अ‌ॅक्टिव्हा चालवणाऱ्या व्यक्तीनं अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. संबंधित गाडीवरील क्रमांक 8531 असून इतर अक्षरं दिसत नाहीत किंवा तो फोटो खोटा असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होता. त्यामुळं संबंधित व्यक्ती किंवा मुलाबाबत काही माहिती मिळाल्यास आमदार महेश लांडगे यांच्याकडे किंवा मुलाच्या कुटुंबीयाकंडे संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं होता. फेसबुकवरही अनेकांनी पोस्ट करत स्वर्णवचा शोध घेण्याचं आवाहन केलं होतं. गेल्या दिवसांपासून ताटातूट झाल्यानं स्वर्णवच्या वडिलांनीही अपहरण करणाऱ्यांना पोटतिडकीनं आवाहन केलं होतं. मागाल ते देतो असं म्हणत त्यांनी काळजाच्या तुकड्याला सोडा असं भावनिक आवाहन त्यांनी केलं होतं.

दहा दिवस स्वर्णव होता कुठे?

दरम्यान, स्वर्णव दहा दिवस होता कुठे? तो राहिला कुठे? कोण त्याला घेऊन गेलं होतं? त्याच्यासोबत नेमकं काय घडलं? याची माहिती मिळू शकलेली नाही. असं असलं तरी स्वर्णव घरी परतल्यामुळे त्यांच्या आईवडिलांच्या जीवात जीव आलाय.

संबंधित बातम्या :

13 वर्षीय मुलीची आई घरी नाही पाहून गैरवर्तन, औरंगाबादेत घरमालकाला बेड्या!

Pune crime |अपहरणाची माहिती सांगण्यासाठी मागितली 2 लाखांच्या खंडणी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या