Weather Updates: पुणेकरांनो सावधान! विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

| Updated on: May 24, 2021 | 10:57 AM

सकाळपासून पुण्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. | Pune Rain weather update

Weather Updates: पुणेकरांनो सावधान! विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Follow us on

पुणे: पुणे शहरात मंगळवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागातून वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास पुण्यात पावसाला (Rain) सुरुवात होईल. हा पाऊस मुसळधार स्वरुपाचा असू शकतो. त्यानंतर बुधवारी सकाळपासून पुण्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Heavy rain expected in Pune on Tuesday evening )

तर दुसरीकडे मान्सूनचा पाऊस केरळच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. 27 मे ते 2 जून या कालावधीत केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. तर साधारण 1 जूनच्या आसपास मान्सूनचे केरळात आगमन होईल. त्यानंतर 8 ते 10 जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात येऊन स्थिरावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

भारतावर यास चक्रीवादळाचे संकट

तौक्ते चक्रीवादळानंतर आता वायव्य समुद्रकिनाऱ्यावर यास चक्रीवादळ धडकणार आहे. ओदिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना या वादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या वादळाची निर्मिती झाली आहे. यादृष्टीने आता केंद्र सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी वादळाच्या टप्प्यात असलेल्या राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. तसेच वादळाच्या काळात मदत करण्यासाठी एनडीआरएफ आणि इतर पथकांना तैनात केले जात आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर वायूसेना आणि नौसेनेला मदतीच्यादृष्टीने सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या 

Monsoon Rain : मान्सून अंदमानात दाखल, हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला!

कसा असेल यावर्षीचा मान्सून, पाऊसकाळ? स्कायमेटचा हा अंदाज वाचा

ऐन कोरोना काळात गूड न्यूज! यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज

(Heavy rain expected in Pune on Tuesday evening )