Pune Crime : माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस?, प्रेमप्रकरणातून तरूणावर जीवघेणा हल्ला; येरवड्यात मोठा राडा

पुण्यातील येरवडा परिसरात प्रेमप्रकरणातून एक रक्तरंजित थरार घडला. 'माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस?' या रागातून नव्या प्रियकराने आपल्या साथीदारांसह जुन्या प्रियकराला नेताजी चौकात अडवून धारदार शस्त्रांनी व लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune Crime : माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस?, प्रेमप्रकरणातून तरूणावर जीवघेणा हल्ला; येरवड्यात मोठा राडा
| Updated on: Aug 17, 2026 | 4:12 PM

विद्येचं माहेरघर अशी पुण्याची ओळख, मात्र गेल्या काही काळापासून पुण्यात व आजूबाजूच्या परिसरात गुन्ह्यांच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यातच आता पुण्यातील नेताजी चौकात एक रक्तरंजित थरार घडल्याचं दिसून आलं. प्रेमप्रकरणातून पुण्यात जोरदार राडा झाला . आपल्या प्रेमिकेकडे तिच्या जुन्या प्रियकराने पाहिल्यामुळे तरूण भलताच संतापला. आणि त्याच रागाच्या भरात त्याने तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला केला, तसेच त्याला बेदम मारहाणही केल्याचा भयानक प्रकार घडला. येरवडा परिसरात प्रेमप्रकरणाच्या वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे प्रचंड खळबळ माजली. ‘माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस?’ असा जाब विचारत नवीन प्रियकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने जुन्या प्रियकराला भररस्त्यात गाठलं आणि त्याला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार,पुण्यातील गोल्फ क्लब रोडवरील नेताजी चौक परिसरात हा प्रकार घडला. पीडित जखमी तरुणाचं पूर्वी एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, त्यानंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले आणि त्या तरुणीचे दुसऱ्या तरुणासोबत संबंध निर्माण झाले. मात्र, त्या जुन्या प्रियकराने आपल्या प्रेयसीकडे पाहिल्याचा राग नवीन प्रियकराच्या मनात होता. त्यातूनच त्याने साथीदारांना सोबत घेत तरुणाला गाठण्याचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

अखेर त्या तरूणाने आपल्या प्रेयसीच्या जुन्या प्रियकराला गोल्फ क्लब रोडवरील नेताजी चौक परिसरात अडवलं. ‘ तू माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस?’ असा जाब विचारत आरोपींनी त्याच्याशी वाद घातला. काही क्षणांतच हा वाद पेटला आणि त्याला हिंसक स्वरूप मिळालं. संतापाच्या भरात आरोपींनी त्या दांडक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढंच नव्हे तर धारदार शस्त्रानेही तरुणावर हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

जखमी तरूणावर उपचार सुरू

या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नेताजी चौक आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत असून, त्याच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्रेमप्रकरणातील वाद इतका टोकाला गेला की भररस्त्यात शस्त्र चालवण्यापर्यंत प्रकरण पोहोचले. त्यामुळे या घटनेने येरवडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्याचे पूर्वनियोजन होते का, कती आरोपी होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us