AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda-Sunita Ahuja Controversy : प्रेमावरील विश्वास डळमळीत.. गोविंदा आणि सुनीताच्या कॉन्ट्रोव्हर्सीदरम्यान सुनेची क्रिप्टीक पोस्ट, चर्चांना उधाण

गोविंदा आणि सुनीता आहूजा यांच्यातील वैवाहिक वादाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, अभिनेत्री कश्मीरा शाहने 'खरं प्रेम' अस्तित्वात आहे का, असा प्रश्न विचारणारी क्रिप्टिक पोस्ट केली. तिच्या या पोस्टमुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Govinda-Sunita Ahuja Controversy : प्रेमावरील विश्वास डळमळीत.. गोविंदा आणि सुनीताच्या कॉन्ट्रोव्हर्सीदरम्यान सुनेची क्रिप्टीक पोस्ट, चर्चांना उधाण
पोस्टमधून काश्मीरा शाहचा इशारा कोणाकडे ?
| Updated on: Aug 17, 2026 | 10:33 PM
Share

सुपरस्टार गोविंदा (Govinda) आणि सुनीता आहूजा यांच्या वैवाहिक जीवनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दोघांमध्येही काही आलबेल नसल्याचं चित्र दिसत असून गोविंदा आणि सुनिता एकमेकांवर सातत्याने टिप्पणी करताना, टोमणे मारताना दिसतात. त्या दोघांकडूनही एकमेकांबद्दल केली जाणारी वक्तव्य देखील चर्चेचा विषय ठरलीत. मात्र आता याचदरम्यान गोविंदा याचा भाचा, अभिनेता कृष्णा अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाहने केलेल्या एका कमेंटने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न आणि विश्वासघाताबद्दल निराशा व्यक्त केली. तिच्या क्रिप्टीक पोस्टने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

कश्मीरा शाहने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आकाशात हृदयाच्या आकाराचा धुरकट ढगाचा फोटो शेअर केला. मात्र फोटोपेक्षा त्यासोबत लिहिलेल्या तिच्या शब्दांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. कश्मीराने खऱ्या प्रेमावर प्रश्न उपस्थित केले.

View this post on Instagram

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

खरं प्रेम अजूनही अस्तित्वात आहे का?

या फोटोसोबत काश्मिराने एक पोस्टही लिहीली, “हेच खरं प्रेम असतं का? खरंच असं प्रेम अस्तित्वात आहे का? एखादी व्यक्ती कोणावर इतकं प्रेम करू शकते का की त्याच्यासाठी पैसे खर्च करेल आणि त्याला स्पेशल असल्याची जाणीव करून देईल? असं प्रेम कुठे मिळतं? आणि ती व्यक्ती कोण आहे?” असं काश्मिराने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय. मात्र एवढंच नव्हे तर, पुढे तिने लग्नं तुटताना आणि लोक एकमेकांना धोका देताना पाहून आपला प्रेमावरील विश्वास डळमळीत झाल्याचंही म्हटलं. या पोस्टद्वारे काश्मीराचा रोख नेमका कोणाकडे, याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सुनीता आहूजाने केले होते आरोप

खरंतर, गोविंदा आणि सुनीता आहूजा यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या काळात कश्मीरा शाहची ही पोस्ट समोर आली आहे. सुनीता आहूजाने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये लग्न आणि विश्वासघाताबद्दल काही स्पष्ट वक्तव्यं केली होती. तसेच गोविंदाच्या कथित अफेअर्सबाबतही तिने अनेक दावे केले होते. त्यामुळे अभिनेत्याची प्रतिमा सार्वजनिकपणे खराब होत असल्याचेही चर्चा जात आहे.

काही दिवसांपूर्वी पापाराझींशी बोलताना सुनीता यांनी गोविंदासोबत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचा उल्लेख केला होता. मात्र तिच्या काही वक्तव्यांनी मनोरंजन विश्वात चांगलीच खळबळ उडाली.

गोविंदानेही दिलं होतं स्पष्टीकरण

सुनीता हिच्या वक्तव्यांनंतर गोविंदानेही व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली होती. सुनीता आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला होता. गोविंदाने सुनीता हिला शिवीगाळ थांबवण्याचा आणि आपल्या भाषेवर थोडं नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला होता. तसेच केवळ एखादी तरुण अभिनेत्री आपल्यासोबत दिसली म्हणून आपलं अफेअर आहे, असा निष्कर्ष काढणे चुकीचं असल्याचंही गोविंदाने बोलून दाखवलं होतं.

आता कश्मीरा शाहच्या या पोस्टमुळे नवी चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!