Ahmednagar : आता सरकार तुमचं आहे तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत? विखे-पाटलांचा‌ प्राजक्त तनपुरेंवर घणाघात

| Updated on: Dec 06, 2021 | 3:09 PM

तुमचं अपयश आणि पाप झाकण्यासाठी तुम्ही भाजप सरकारवर आरोप करत आहात. आता सरकार तुमचं आहे, तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? असा सवाल तनपुरेंना विखे-पाटलांनी केला आहे.

Ahmednagar : आता सरकार तुमचं आहे तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत? विखे-पाटलांचा‌ प्राजक्त तनपुरेंवर घणाघात
radhakrishna vikhe-patil
Follow us on

अहमदनगर : वीज वितरणची थकबाकी भाजप सरकारमुळे वाढल्याचा आरोप ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला होता यावर विखे-पाटील यांनी तनपुरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तुमचं अपयश आणि पाप झाकण्यासाठी तुम्ही भाजप सरकारवर आरोप करत आहात. आता सरकार तुमचं आहे, तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? असा सवाल तनपुरेंना विखे-पाटलांनी केला आहे.

वीज तोडणीविरोधात भाजपचा भव्य मोर्चा

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वात सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. शेतीचे वीज कनेक्शन कापू नये, वीजबिलं माफ करावी ही मागणी करत शेकडो आंदोलकांच्या घोषणांनी संगमनेर शहर दुमदुमून गेले. गेल्या दोन वर्षापासून राज्यातील कोणताही घटक राज्य सरकाच्या कारभारावर समाधानी नाही. तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते तरी पूर्ण करा, अशी मागणी करत सरकारला केवळ वसुली करायचं माहीत आहे. राज्यातील सामान्य जनतेशी यांना काहीही देणं घेणं नाही असा घणाघाती आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.

बाळासाहेब थोरातांना वसुलीतून वेळ मिळतो ‌का?

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजले आहेत का? थोरातांना वसुलीतून वेळ मिळतो का? असा टोलाही यावेली विखे-पाटलांनी लगावला आहे. कोणतेही सरकार आलं तर शेतकऱ्यांना मदत गरजेची आहे.  तुमची वसुली थांबवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, अशी टीका विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी सध्या वीज तोडणीविरोधात शेतकरी आक्रमक झालेत, अनेक ठिकाणी मोर्चेही निघाले. पिकं ऐण भरात आली असताना शेतकऱ्यांना हातातोंडाला आलेली पिकं करपण्याची भिती आहे.